Khed | राष्ट्रीय उत्कृष्ट सरपंच पुरस्काराने सरपंच पुजा विश्वास बुट्टेपाटील यांचा सन्मान
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचे हस्ते बुट्टेपाटील यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला
Ramdas athvale | puja buttepatil
महावार्ता लाईव्ह | नवी दिल्ली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल इन्स्टिटयूट या केंद्र शासनाच्या संस्थेकडून खेड तालुक्यातील वराळे गावच्या विद्यमान सरपंच पूजा विश्वास बुट्टे पाटील यांना " राष्ट्रीय उत्कृष्ट सरपंच पुरस्कार " केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
वराळे गावात शासनाच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी कामे सरपंच पूजा बुट्टे पाटील यांच्या कार्यकाळात मार्गी लागली असून अनेक कामे प्रगतीपथावर आहेत.विकास प्रक्रियेने गाव तालुक्यासह जिल्ह्यात पुढे नेण्यासाठी त्यांचे अथक प्रयत्न सुरु असून गावाला तालुका,जिल्हा व राज्यस्तरावरील अनेक पुरस्कार मिळाले आहेत.गावासाठी त्यांनी मोठे योगदान दिल्याने त्यांच्या यशस्वी कार्याची दखल दिल्लीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल इन्स्टिटयूटने घेऊन त्यांना राष्ट्रीय उत्कृष्ठ सरपंच पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला.वराळे हे गाव आदर्श जिल्हा परिषद सदस्य व भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टेपाटील यांचे आहे.
सरपंच बुट्टे पाटील यांना पुरस्कार केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, केंद्रीय मंत्री विजय राज, मराठी अभिनेत्री दिपाली सय्यद, वाईचे खासदार नितीन पाटील यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, भाजप नेते विनोद तावडे, खासदार निलेश लंके आदींनी सरपंच बुट्टे पाटील यांचे अभिनंदन केले.यावेळी देशाचे सर्वोच्च ठिकाण संसद भवन, आणि राष्ट्रपती भवनला भेट देण्याचा बहुमान सरपंचांना मिळाला. पुरस्कार मिळाल्याबद्दल बुट्टे पाटील यांचे खेड तालुक्यातील सरपंच परिषदेच्या सरपंचांनी व गावच्या ग्रामस्थांनी अभिनंदन केले.