ढोरे भांबुरवाडी ग्रामपंचायतीच्या  सरपंचपदी युवानेते संतोष ढोरे यांची बिनविरोध निवड

ढोरे भांबुरवाडी ग्रामपंचायतीच्या  सरपंचपदी युवानेते संतोष ढोरे यांची बिनविरोध निवड

राजगुरूनगर : खेड तालुक्यातील ढोरे भांबुरवाडी ग्रामपंचायतीच्या  सरपंचपदी युवानेते संतोष शंकर ढोरे यांची बिनविरोध निवड झाली.निवडीनंतर गावातून काढलेल्या मिरवणुकीत गुलाल भंडारची मुक्तपणे उधळण करीत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

ठरल्याप्रमाणे दत्तात्रय ढोरे यांनी मुदतीत सरपंचपदाचा राजीनामा दिला.त्यामुळे रिक्त सरपंचपदाची निवडणूक ग्रामपंचायतीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी सविता घुमटकर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.संतोष ढोरे यांनी निर्धारित वेळेत सरपंचपदाचे नामनिर्देशनपत्र दाखल केले.अन्य कुणाचेही नामनिर्देशनपत्र न आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा घुमटकर यांनी सभागृहात सदस्यांच्या उपस्थितीत केली.निवडणुकीचे प्रशासकीय कामकाज ग्रामसेविका दौंडकर यांनी पाहिले. निवडीनंतर ढोरे यांचा सभागृहात सत्कार करण्यात आला.

निवडणूक प्रसंगी सभागृहात मावळते सरपंच दत्तात्रय ढोरे,उपसरपंच श्रीकृष्ण भांबुरे,ग्रामपंचायत सदस्य  माया गोरडे,कमल ढोरे,सुरेखा जरे,अरुणा जरे,कविता कोतवाल हे उपस्थित होते.तर योगेश भिसे हे सदस्य निवडणूक प्रसंगी अनुपस्थित राहिले.निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माजी उपसभापती माणिक भांबुरे,भरत भांबुरे,बाळासाहेब ढोरे यांनी प्रयत्न केले.निवडणुकवेळी मंगेश गुंडाळ,मयूर जगदाळे,अशोक जरे,गणपत ढेरंगे, दत्तात्रय भांबुरे,पांडुरंग कोतवाल,भीमराव ढेरंगे आदी उपस्थित होते.