कुडा संघाने प्रथम क्रमांक मिळवीत हुतात्मा राजगुरू चषक पटकाविला
खेड तालुका प्राथमिक शिक्षक संघाने आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेत कुडा संघाने प्रथम क्रमांक मिळवीत हुतात्मा राजगुरू चषक पटकाविला.
राजगुरूनगर : खेड तालुका प्राथमिक शिक्षक संघाने आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेत कुडा संघाने प्रथम क्रमांक मिळवीत हुतात्मा राजगुरू चषक पटकाविला.
खेड तालुका प्राथमिक शिक्षक संघाने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन हुतात्मा राजगुरु क्रीडा संकुलाच्या मैदानावर करून या स्पर्धेत शिक्षकांचे १० संघ सहभागी झाले होते. शिक्षकांच्या क्रिकेटचा थरार पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी होती.अंतिम सामना कुडा व वाडा संघात अतिशय चुरशीने होऊन कुडा संघाने वाडा संघाचा पराभव करीत प्रथम क्रमांकाचा हुतात्मा राजगुरू चषक पटकावला.

स्पर्धचे उद्घाटन जिपच्या माजी अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या हस्ते झाले.यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर,जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, शिक्षक नेते विठ्ठल तांबे,राज्य उपाध्यक्ष राजेश कांबळे, शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष तानाजी महाळुंगकर,महिला अध्यक्षा पूनम मुळूक आदी उपस्थित होते.तर राजगुरुनगर बँकेचे अध्यक्ष राहुल तांबे,संचालक विनायक घुमटकर, गणेश थिगळे,अरूण थिगळे,दिलीप मेदगे यांनी स्पर्धेला भेट दिली.

क्रिकेट स्पर्धेत वाडा,कुडा,डेहणे,पाईट,कडूस,खेड, खरपुडी,चाकण १,चाकण २ आणि पंचायत समिती शिक्षण विभाग अशा १० संघात चुरशीने सामने रंगले होते.कुडा संघाने विजेतेपद तर वाडा संघाने उपविजेतेपद मिळविले. तर डेहणे संघाने तृतीय,पाईट संघाने चतुर्थ तर खेड संघाने पाचवा क्रमांक मिळवला.स्पधेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून अमित भोंग,सर्वोत्तम गोलंदाज संदिप तुपे,सर्वोत्तम फलंदाज मंगेश वायाळ,सर्वोत्तम क्षेत्ररक्षक विकास म्हसे, सर्वोत्तम यष्टीरक्षक बापू दराडे तर उत्कृष्ट झेल मंगेश शेंडे यांची निवड झाली.स्पधेचे धावते समालोचन शिक्षक संघाचे सुनिल वाघ,संजय घुमटकर यांनी केले.
----------------------------------------
