Khed | कृषी विभागातील कृषी सहाय्यक ज्योती राक्षे यांना सुवर्णपदक

ज्योती रामचंद्र राक्षे या माहीला खेळाडूने पाॅवर लिफ्टिंग स्पर्धेत २३५ किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळविले. 

Khed  | कृषी विभागातील कृषी सहाय्यक ज्योती राक्षे यांना सुवर्णपदक
Agricultural Assistant Jyoti Rakshe 

 

राजगुरूनगर | खेड पंचायत समिती कृषी विभागातील कृषी सहाय्यक पदावर कार्यरत असलेल्या ज्योती रामचंद्र राक्षे या महिला खेळाडूने पाॅवर लिफ्टिंग स्पर्धेत २३५ किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळविले.   

 

मास्टर गेम असोसिएशनमहाराष्ट्र यांच्या वतीने नाशिक येथील मीनाताई ठाकरे स्टेडियम मध्ये राज्यस्तरीय मास्टर गेम स्पर्धा संपन्न झाल्या. खेड कृषी विभागातील कृषी सहाय्यक ज्योती राक्षे मास्टर गेम राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेच्या ६३ किलो वजनी गटात डेडलिफ्ट मध्ये १०० किलो,स्काॅट मध्ये ८० किलो आणि बेंच मध्ये ५५ किलो असे सर्व मिळुन २३५ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. 


राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळाल्याने राक्षे या खेळाडूची ओरिसा राज्यात होणाऱ्या राष्ट्रीय मास्टर गेमसाठी निवड झाली.राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने खेड तालुका व पुणे जिल्ह्यातील सर्व कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राक्षे हिच्या यशाबद्दल अभिनंदन केले.राक्षे यांनी मिळालेल्या गोल्ड मेडलचा बहुमान शेतकऱ्यांना समर्पित केला.राक्षेवाडी ग्रामस्थांनी देखील त्यांचे अभिनंदन केले.राक्षे हिला पाॅवरलिफ्टिंग खेळाचे प्रशिक्षण प्रशांत विकास वाघमारे व प्रशांत पोखरकर यांनी दिले.शासनाच्या विविध विभागातील खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला होता.


कृषि विभागातील योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्याचे काम करत असताना राक्षे यांनी खेळातील आपली आवड जपली. राज्यस्तरीय स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवून राज्यात खेड कृषी विभागाचे नाव मोठे केले.ज्योती राक्षे या खेळाडूचा आम्हाला अभिमान वाटतो.पुढील राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवावे.
सतीश शिरसाट - उपविभागीय कृषी अधिकारी,खेड विभाग 

 

आई,वडिल,पती व माझ्या शेतकऱ्यांच्या आशिर्वादामुळे हे मेडल मिळाले आहे.पुढे राष्ट्रीय पातळीवर मेडल मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.खेळासाठी मला माझ्या कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पाठबळ मिळत असल्याने या सर्वांच्या जोरावर मी यश मिळवीत आहे.
ज्योती राक्षे - राज्यस्तरीय सुवर्णपदक विजेती खेळाडू