RajgurNagar sahkari Bank election | उत्तर पुणे जिल्ह्यातील अग्रेसर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी रामदास धनवटे यांची बिनविरोध निवड

सभासदांसाठी पाच लाख रुपयांचा अपघाती विमा ; बँकेचा भव्य विस्तार : चाकण-शिक्रापूर रोड, चाकण शहर आणि तळेगाव येथे तीन नवीन शाखा ; अध्यक्ष सागर पाटोळे यांची माहिती

RajgurNagar sahkari Bank election | उत्तर पुणे जिल्ह्यातील अग्रेसर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी रामदास धनवटे यांची बिनविरोध निवड

उपाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारताना रामदास धनवटे यांच्या समवेत अध्यक्ष सागर पाटोळे व संचालक

 

महावार्ता लाईव्ह | उत्तर पुणे जिल्ह्यातील प्रमुख सहकारी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजगुरुनगर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी रामदास धनवटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नवनिर्वाचित उपाध्यक्ष रामदास धनवटे यांचा सन्मान बँकेच्या संचालकांच्या वतीने करण्यात आला.

 

निवडणूकी वेळी राजगुरुनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष सागर पाटोळे, जेष्ठ विद्यमान संचालक, माजी अध्यक्ष किरण आहेर, गणेश थिगळे,अविनाश कहाणे राहुल तांबे, दिनेश ओसवाल, समीर आहेर, विजया शिंदे, दत्ता भेगडे, विनायक घुमटकर, अश्विनी पाचारणे, राजेंद्र सांडभोर, विजय डोळस, अरुण थिगळे, सचिन मांजरे आणि राजेंद्र वाळुंज उपस्थित होते.

 

यावेळी राजगुरुनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष सागर पाटोळे यांनी महत्त्वाची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, बँकेच्या सर्व सभासदांसाठी पाच लाख रुपयांचा अपघाती विमा उपलब्ध करण्यात आला आहे. बँकेच्या भविष्यातील विस्तार योजनेची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, राजगुरुनगर सहकारी बँक लवकरच तीन नवीन शाखा सुरू करणार आहे. या नवीन शाखा चाकण-शिक्रापूर रोड, चाकण शहर आणि तळेगाव येथे उभारल्या जाणार आहेत. या विस्तारामुळे बँकेच्या सेवेचा विस्तार होणार असून, अधिकाधिक ग्राहक आणि सभासदांना बँकेच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.

 

रामदास धनवटे यांच्या उपाध्यक्षपदी निवडीमुळे बँकेच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास संचालक मंडळाने व्यक्त केला आहे. बँकेच्या सर्व संचालकांनी नवनिर्वाचित उपाध्यक्षांना शुभेच्छा दिल्या आणि भविष्यातील यशस्वी सहकार्याचे आश्वासन दिले.