Khed | कोरेगाव बु विकास सोसायटी चेअरमनपदी श्रीकांत डावरे तर व्हाईस चेअरमनपदी तुकाराम गोगावले यांची बिनविरोध निवड

कोरेगाव बुद्रुक ग्रामस्थांच्या एकीतून निवडणूक बिनविरोध झाल्याने ग्रामस्थांचा आनंद व्यक्त करत जल्लोष

Khed | कोरेगाव बु विकास सोसायटी चेअरमनपदी श्रीकांत डावरे तर व्हाईस चेअरमनपदी तुकाराम गोगावले यांची बिनविरोध निवड

 

महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्याच्या सहकार क्षेत्रातील अतिशय महत्वाच्या कोरेगाव बुद्रुक विकास सोसायटी चेअरमनपदी श्रीकांत दत्तात्रय डावरे यांची तर व्हाईस चेअरमनपदी तुकाराम जन्याबा गोगावले यांची निवड बिनविरोध झाली.सोसायटीचे दोन्ही पदाची निवडणूक कोरेगाव बुद्रुक ग्रामस्थांच्या एकीतून बिनविरोध झाल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करीत जल्लोष केला.

 

सोसायटीचे संचालकांना चेअरमन व व्हा.चेअरमन पदाची संधी मिळावी म्हणून ठरल्याप्रमाणे आपल्या पदाची मुदत संपताच चेअरमनपदाचा शिवाजी लवंगे व व्हा. चेअरमनपदाचा संजय गोगावले यांनी राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त दोन्ही पदांची निवडणूक राजगुरूनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात निवडणूक अधिकारी एस.बी.राऊत यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.सोसायटी सचिव माणिक डांगले यांनी निवडणूक कामात राऊत यांना मदत केली.चेअरमन पदासाठी श्रीकांत डावरे आणि व्हा.चेअरमनपदाकरिता तुकाराम गोगावले यांचेच एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा राऊत यांनी संचालकांच्या उपस्थितीत सभागृहात केली.निवडीनंतर डावरे व गोगावले यांचा सत्कार संचालक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन करण्यात आला.

 

निवडणूक प्रसंगी सभागृहात नवनिर्वाचित चेअरमन श्रीकांत डावरे,व्हा. चेअरमन तुकाराम गोगावले, सोसायटीचे माजी चेअरमन व माजी उपसरपंच रोहित डावरे पाटील, शिवाजी लवंगे, संजय गोगावले, गणेश गोगावले,मनोहर कल्हाटकर, महेंद्र डावरे, तात्यासाहेब कल्हाटकर, नानासाहेब लोंढे, जानताबाई डावरे, सुरेखा डावरे,bदत्तात्रय गेनभाऊ डावरे, अर्जुन गोगावले, विक्रम डावरे, संदीप डावरे, विजय डावरे, हनुमंत सपकाळ, संतोष गोगावले, दत्तात्रय गुंजाळ,भानुदास कल्हाटकर, पोपट कल्हाटकर, ऋषिकेश लवंगे, संभाजी गारगोटे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.



सोसायटीच्या सभासद शेतकऱ्यांना मागणीनुसार खरीप व रब्बी हंगामासाठी कर्ज पुरवठा सोसायटीच्या माध्यमातून केला जाईल. दिलेल्या कर्जाची फेड ३१ मार्च पर्यंत केल्यानंतर शेतकऱ्यांना त्वरित केले दिले जाते. सोसायटीकडून कर्ज घेऊन शेतीच्या पीक उत्पनातून आपली प्रगती साधण्यासाठी हक्काची सोसायटी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. सभासद शेतकऱ्यांनी कर्जाची मागणी सोसायटीकडे केल्यास कर्ज दिले जात आहे.
श्रीकांत डावरे पाटील - चेअरमन 
तुकाराम गोगावले - व्हाईस चेअरमन