Khed zp Election | सावरदरी गावच्या अश्विनीतताई तरस यांना पंचायत समिती निवडणुकीसाठी गावच्या ग्रामस्थांनी दिला एकमुखी पाठिंबा
महाळुंगे गणातून अश्विनी तरस यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
महावार्ता लाईव्ह | महाळुंगे गणातून पंचायत समितीची निवडणूक लढविणाऱ्या सावरदरी गावच्या सक्षम व सुशिक्षित उमेदवार अश्विनी सोमनाथ तरस यांना सावरदरी गावाने एकमुखी पाठिंबा दिला आहे.गावाने एकमुखी पाठिंबा दिल्याने उमेदवार अश्विनी तरस यांचा महाळुंगे गणातून विजय निश्चित मानला जात आहे.
एमआयडीसी क्षेत्रात असलेल्या सावरदरी गावाला शासनाचा स्मार्ट व्हिलेज पुरस्कार प्राप्त गाव म्हणून सावरदरी गावची खेड तालुक्यासह जिल्ह्यात वेगळी ओळख आहे.या गावातील प्रतीतयश उद्योजक सोमनाथशेठ तरस यांच्या पत्नी व धडाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी तरस या महाळुंगे पंचायत समिती गणातून पंचायत समितीची निवडणूक लढवीत आहेत.सुशिक्षित व सामाजिक कार्याची आवड असलेल्या उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.गाव म्हटलं की प्रत्येक गावात गटतट हे हमखास असतातच,परंतु अश्विनी तरस ह्या तालुका पातळीवरील पंचायत समितीची निवडणूक लढवीत असल्याने गावातील सर्वांनी गटतट व मतभेद विसरून अश्विनीताई तरस यांच्या पाठीमागे निवडणुकीत ठामपणे राहण्याचा निर्धार व्यक्त करून गावाने त्यांना एकमुखी पाठिंबा दर्शविला आहे.
सावरदरी गावातील सर्व ग्रामस्थांची ग्रामदैवत असलेल्या श्री गोंधळजाई मंदिरात पंचायत समिती निवडणुक संदर्भात सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती.यावेळी उपस्थित ग्रामस्थ व नागरिकांनी सावरदरी गावच्या पंचायत समितीच्या सक्षम उमेदवार अश्विनीताई सोमनाथ तरस यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.सावरदरी गावात सर्व ग्रामस्थांनी आपले सर्व मतभेद बाजूला ठेवून गावासाठी एकत्र येण्याचा महत्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला.केवळ निवडणूकच नाही तर गावच्या हितासाठी जेजे निर्णय घ्यायचे असतील त्यासाठी आपण सर्वांनी भविष्यात देखील एकत्र काम करायला हवे असे विचार यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त करताना तरस यांना एकमुखी पाठिंबा दिला.
आयोजित केलेल्या ग्रामस्थांच्या बैठकीला उद्योजक सोमनाथ तरस, माजी सरपंच संजय चौधरी, उद्योजक गणेश तरस, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष रविंद्र गाढवे, माजी सरपंच भरत तरस, विद्यमान सरपंच संदिप पवार, माजी सरपंच अंकुश कदम, भजनी मंडळाचे अध्यक्ष गणपत साकोरे, बाळासाहेब पवार, संतोष शिंदे, नाना शेटे, रविंद्र बुचुडे, रविंद्र पवार, संदिप बुचुडे, निखिल पवार, संतोष शेटे,बाळासाहेब ज्ञानोबा पवार, नवनाथ गाढवे, माजी सरपंच मनेश शेटे, बाबाजी शेटे,शहाजी बुचुडे,हभप तुकाराम तरस,बाळासाहेब चौधरी, रामचंद्र पवार, बाळासाहेब बोत्रे, नवनाथ शेटे, शंकर पवार, बाजीराव हंबीर, विश्वास धोंडगे, महेश धोंडगे यांसह अनेक गावचे कार्यकर्ते,युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
