श्रीक्षेत्र येलवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते व खेड तालुका विद्या विकास प्रतिष्ठानचे संचालक विश्वासअण्णा बोत्रे पाटील यांचे निधन.
चाकण : प्रतिनिधी
श्रीक्षेत्र येलवाडी (ता.खेड) येथील अनेक वारकरी संस्थांचे पदाधिकारी,येलवाडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य,खेड तालुका विद्या विकास प्रतिष्ठानचे संचालक व सामाजिक कार्यकर्ते विश्वासराव बाळासाहेब बोत्रे (वय ६१) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या मागे पत्नी,एक मुलगा,एक मुलगी,तीन भाऊ,दोन बहिणी, पुतणे,जावई असा मोठा परिवार आहे.त्यांच्या निधनाने गावासह त्यांच्या मित्र परिवारात हळहळ व्यक्त होत आहे.
तालुक्यातील अनेक नेत्यांच्या माध्यमातून त्यांनी गावात विकासकामे केली.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कंपनीच्या उदघाटनासाठी वासुलीत आल्यावर त्यांना भेटण्याची संधी मिळाली आणि त्यांनी पुष्पगुच्छ देऊन मोदींचे स्वागत केले.माजी आमदार स्व.नारायण पवार,स्व. सुरेश गोरे तसेच आमदार दिलीप मोहिते पाटील यांचेशी त्यांचे चांगले संबंध होते.जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांचे बरोबर त्यांची २२ वर्षांपासूनची दिलदार मैत्री होती.चांगल्या वाईट प्रसंगात शरद पाटलांना त्यांनी कायम साथ दिली.बुट्टे पाटलांना त्यांनी आपला नेता मानून त्यांच्यावर जीवापाड प्रेम केले. शरद बुट्टे पाटील तालुक्याचे आमदार व्हावेत अशी त्यांची खूप इच्छा होती आणि आम्हाला शरदराव आमदार झालेला पहायचे आहे,असे ते नेहमी मित्रांसोबत गप्पा मारताना बोलत असायचे.तालुक्यातील अनेक नेत्यांबरोबर त्यांनी राजकारणात काम केले.
गावच्या विकासात त्यांचा मोठा सहभाग राहिला. गावच्या अनेक धार्मिक संस्थांवर ते कार्यरत होते.येलवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार प्रसंगी तालुक्यातील अनेक मान्यवर पदाधिकारी हजर असताना अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.अँड चंद्रकांत बोत्रे,विजय बोत्रे,दिनकर बोत्रे यांचे ते जेष्ठ बंधू होत.
-----------------------------------------------------------------
