कोरोना रुग्णांची सेवा करणारेच खरे कोरोना योद्धे : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार

करंजविहिरे प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषदेचे सदस्य शरद बुट्टे पाटील,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भगवान पवार,उपसभापती चांगदेव शिवेकर,अमोल पवार आदींच्या हस्ते कोरोना योद्धा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कोरोना रुग्णांची सेवा करणारेच खरे कोरोना योद्धे : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार

राजगुरूनगर : प्रतिनिधी
       कोरोनाबाधित रुग्णांच्या घरात जाऊन जिल्हा परिषदेचे वैद्यकीय अधिकारी,आरोग्य कर्मचारी,अंगणवाडी सेविका- मदतनीस,आशा वर्कर,शिक्षक,ग्रामपंचायत कर्मचारी यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम केल्याने हे खरे कोरोना योद्धे आहेत,असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार यांनी केले.
        खेडच्या पिंपरी–पाईट गटातील आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी,अंगणवाडी सेविका- मदतनीस,आशा वर्कर,केंद्रप्रमुख,शिक्षक,विस्तार अधिकारी,ग्रामसेवक,ग्रामपंचायत कर्मचारी यांना कोरोना योद्धा पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते.करंजविहिरे प्राथमिक आरोग्य केंद्रात या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी (दि.९) या गटाचे  सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी केले होते.
      यावेळी जिल्हा परिषदेचे गटनेते शरद बुट्टे पाटील, पंचायत समितीचे उपसभापती चांदवेव शिवेकर,सदस्य अमोल पवार,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.बळीराम गाढवे,करंजविहीरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.जयश्री महाजन,पाईट केंद्राच्या डॉ. अश्विनी कांबळे,कोरेगावचे उपसरपंच रोहित डावरे, संजय रौधळ,सुनील देवकर,दत्तात्रय टेमगिरे,रामदास कोळेकर,सरपंच संजय देशमुख,मंगल भांगे,दिनेश लांडगे,दत्तात्रय मांडेकर,ज्ञानेश्वर शिवेकर,काळूराम पिंजन आदीसह अनेक गावचे सरपंच,उपसरपंच, सदस्य,सोसायटीचे चेअरमन,व्हा.चेअरमन,संचालक यांचेसह शिक्षक,ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.


      बोलताना बुट्टे पाटील म्हणाले,कोरोना काळात रक्ताच्या नात्यातील माणूस कोरोनाबधित माणसाजवळ जात नव्हता.परंतु आमचे वैद्यकीय अधिकारी,आरोग्य कर्मचारी,अंगणवाडी सेविका-मदतनीस,आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी,शिक्षक यांनी जीव धोक्यात घालून कोरोना काळात काम करून अनेक रुग्णांचे जीव वाचविले.नागरिकांना मदत आणि लसीकरण व्हावे म्हणून आईचे दुःख बाजूला सारून कोरोना काळात नागरिकांसाठी फिरलो.राष्टीय संकट काळात काम करणाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप म्हणून आपण त्यांना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार केल्याचे बुट्टे पाटील यांनी सांगितले.
       मिशन कवच कुंडल योजना ८ ते १४ ऑक्टोबर या ७ दिवसाच्या काळात राबविण्यात येत असून १८ वर्षापुढील नागरिकांना पहिला लसीचा डोस दिला जाणार असून तर ज्यांचा दुसरा डोस राहिला त्यांना दिला जाणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.बळीराम गाढवे यांनी सांगितले.
       लसीकरणासाठी आम्हाला शरद बुट्टे पाटील व गावातील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांचे सहकार्य मिळाले,म्हणून आम्ही उच्चांकी लसीकरण केल्याचे भाषणात डॉ.जयश्री महाजन यांनी सांगितले.
      धर्मराज पवळे, कैलास कुटे,यांचे भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच रोहित डावरे यांनी केले.सूत्रसंचालन निवेदक बाळासाहेब घाटे यांनी केले.आभार सुनील देवकर यांनी मानले.


-------------------------------------------------------