भीमाशंकर सहकार पॅनेलचा दणदणीत विजय : सहकार परिवर्तन पॅनेलचा दारुण पराभव

भीमाशंकर सहकार पॅनेल प्रमुख मा.अध्यक्ष किरण आहेर यांच्या नेतृत्वाखाली १६ पैकी १२ जागा मिळवीत दणदणीत विजय संपादन केला. प्रतिस्पर्धी राजगुरूनगर सहकार परिवर्तन पॅनेलचे अवघे चार उमेदवार निवडून आल्याने या पॅनेलचा दारुण पराभव झाला

भीमाशंकर सहकार पॅनेलचा दणदणीत विजय : सहकार परिवर्तन पॅनेलचा दारुण पराभव
राजगुरूनगर : राजगुरूनगर सहकारी बँकेच्या निवडणुकीत भीमाशंकर सहकार पॅनेलने १६ पैकी १२ जागा मिळवीत दणदणीत विजय संपादन केला. प्रतिस्पर्धी राजगुरूनगर सहकार परिवर्तन पॅनेलचे अवघे चार उमेदवार निवडून आल्याने या पॅनेलचा दारुण पराभव झाला.निवडणुकीत नवख्या सहा उमेदवारांची बँकेत एन्ट्री झाली.तर बँकेच्या विद्यमान चार संचालकांचा पराभव झाला.भांडाऱ्याची मुक्तपणे उधळण करत विजयी पॅनेलचे उमेदवारांची राजगुरूनगर शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.         

 

पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागात अग्रेसर असलेल्या राजगुरूनगर सहकारी बँकेच्या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या १६ जागेसाठी रविवारी (दि.६) मतदान झाले. त्यानंतर झालेल्या मतदानाची मतमोजणी सोमवार (दि.७) रोजी चंद्रमा गार्डन मंगल कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी हरीचंद्र कांबळे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बँकेच्या निवडणुकीत भीमाशंकर सहकार व राजगुरूनगर सहकार परिवर्तन या दोन पॅनेलमध्ये अतितटीचा सामना झाला.कोणता पॅनेल बाजी मारणार याकडे बँकेच्या सभासदांसह बँक शाखा असलेल्या नागरिकांचे लक्ष वेधले होते.

मतमोजणी चालू असताना कार्यालयाबाहेर दोन्ही पॅनेलचे उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती.मतमोजणी प्रसंगी राजगुरूनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षण विजयसिंह चौहान यांचे मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता.मतमोजणी अतिशय  शांततेत पार पडली.कुठेही गडबड गोंधळ झाला नाही.

भीमाशंकर सहकारी पॅनेलचे सर्वसाधारण गटातील विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे- किरण आहेर,समीर आहेर, दिनेश ओसवाल,अँड.राहुल तांबे, अरुण थिगळे, सागर पाटोळे, दत्तात्रय भेगडे, किरण मांजरे, राजेंद्र वाळुंज,राजेंद्र सांडभोर हे विजयी झाले.राजगुरूनगर सहकार परिवर्तन पॅनेलचे गणेश थिगळे, विनायक घुमटकर हे विजयी झाले.

महिला राखीव मधून अश्विनी पाचारणे व विजया शिंदे विजयी झाल्या.तर विद्यमान संचालिका हेमलता टाकळकर यांचा पराभव झाला.नागरिकांचा मागास प्रवर्ग मधून अविनाश कहाणे विजयी झाले.तर या प्रवर्गातून विद्यमान संचालक धनंजय कहाणे व धनंजय भागवत या दोन उमेदवारांचा पराभव झाला.भटक्या विमुक्त जाती जमाती मधून रामदास धनवटे हे विजयी झाले आहेत.तर विद्यमान संचालक डि.के.गोरे यांचा दणदणीत पराभव झाला.यापूर्वी अनुसूचित जाती जमाती मधून विजय डोळस बिनविरोध निवडून आले आहेत.