Shivaji Aadhalrao | आढळराव पाटील यांच्या पक्षप्रवेशाचं ठिकाण ठरलं ; अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार
माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांचे कट्टर समर्थक शिवसेना उपनेते इरफान सय्यद, पुणे जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर शरद सोनवणे राष्ट्रवादी प्रवेश करणार नाही
राजगुरुनगर : २६ मार्चला माजी खासदार शिवाजीआढळराव यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आधिकृत प्रवेश निश्चित झालाय.परंतु आढळराव पाटील यांच्याबरोबर त्यांचे ठराविकच कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत.शिवसेना पक्षाचे सगळेच नेते महायुतीचा घटक म्हणून प्रवेशावेळी शिवसेना उपनेते इरफान सय्यद,जिल्हाप्रमुख शरद सोनवणे,भगवान पोखरकर हे सुद्धा उपस्थित राहतील,परंतु ते राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार नसल्याची माहिती आहे.
आढळरावपाटील यांचा पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालय येथे संपन्न होणार आहे.
या पक्षप्रवेशावेळी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील,आमदार दिलीप मोहिते पाटील,आमदार चेतन तुपे,आमदार अतुल बेनके, तसेच महायुतीतील सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
प्रवेश होणार मात्र...
आढळराव पाटील यांची उमेदवारीची अधिकृत घोषणा सभेत होणार नाही. फक्त आढळराव यांचा पक्षप्रवेश होणार.शिरूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे फायनल झाली आहे.आतापर्यंत महाराष्ट्रातील भाजपाच्या उर्वरित जागा व शिवसेनेच्या व राष्ट्रवादीच्या लोकसभेच्या जागा जाहीर केल्या गेल्या नाहीत. दिल्लीतून ग्रीन सिंगल आल्यावर महायुतीच्या जागा एकत्रितपणे जाहीर होतील असे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आले.
पाटलांनी बोलणं टाळलं....
शिरूरची लढत ही पक्षाचे एकनिष्ठा विरुद्ध बेडूकउड्या मारणारे यांच्यात होणार असल्याचे खासदार अमोल कोल्हे यांनी यापूर्वी आढळराव यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चेवर बेडूकउड्या अशी उपमा देत आढळराव यांच्यावर टीका केली.यावर आढळराव यांनी कोल्हे यांचे मत आहे आणि ते काहीही असू शकतं त्यावर मी काही बोलू शकतं नाही सांगून अधिक बोलणं त्यांनी टाकले.
--------------------------------------------------------
