श्री क्षेत्र भीमाशंकर मंदीर भाविकांना दर्शनासाठी ७ ऑक्टोबर पासून खुले होणार !

भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण.

श्री क्षेत्र भीमाशंकर मंदीर भाविकांना दर्शनासाठी ७ ऑक्टोबर पासून खुले होणार !

राजगुरूनगर : प्रतिनिधी
          बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या खेड तालुक्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान भाविकांसाठी अटी व नियम लागू करून खुले करण्यात येणार आहे.शासनाच्या निर्णयानुसार  दि.७ ऑक्टोबर पासून सर्व मंदिरे उघडणार आहेत. कोरोनाच्या निर्बंधामुळे श्रावण महिन्यात मंदीर बंद होते  आता दर्शनासाठी मंदिर उघडणार असल्याने भाविकांकडून आनंद व्यक्त होत आहे.


          भाविकांनी गर्दी करू नये,मास्क चा वापर करावा,१० वर्षाखालील व ६५ वर्षावरील जेष्ठ भाविकांनी दर्शनासाठी येण्याचे टाळावे.पूजेचे साहित्य व प्रसाद आणू नये तसेच मंदिरच्या भागात कोविड पेशंट आढळल्यास स्वच्छता होईपर्यंत मंदिर बंद करून पुन्हा खुले केले जाईल व दर्शन घेण्यासाठी अटी व नियमाचे पालन करावे.
           तसेच भीमाशंकर मंदिर ते कोंढवळ फाट्यापर्यंत रस्त्याचे काम चालू असल्याने अपघात व वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून भाविकांनी भीमाशंकर पासून २ किलोमीटर अलीकडेच पार्किंग करावे असे आवाहन भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश कौदरे व कार्यकारी विश्वस्त तहसीलदार वैशाली वाघमारे व ट्रस्टच्या वतीने फ्लेक्स लावून करण्यात आले.