शिवेगावच्या उपसरपंचपदी कविता संतोष शिवेकर यांची बिनविरोध निवड

राजगुरूनगर : खेड तालुक्यातील पश्चिम भागातील मोठी असणारी ग्रामपंचायत शिवेच्या उपसरपंचपदी कविता संतोष शिवेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तत्कालीन उपसरपंच निर्मला मारुती कोळेकर यांनी गावातील पॅनल प्रमुखांनी ठरवलेल्या कार्यकाळात राजीनामा दिल्याने जागा रिक्त झालेल्या उपसरपंचपदाची निवडणूक ग्रामपंचायत सभागृहात पार पडली. उपसरपंच पदासाठी कविता संतोष शिवेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली असून शिवे गावातील प्रथम महिला उपसरपंच होण्याचा मान कविता शिवेकर याना मिळाला आहे.
यावेळी पंचायत समिती माजी सभापती चांगदेव शिवेकर, माजी सरपंच शांताराम शिवेकर, माजी चेअरमन नामदेव शिवेकर, बबन सातपुते, गबाजी शिवेकर, पोलीस पाटील ज्ञानेश्वर साळुंके, भाजपा उपाध्यक्ष नवनाथ शिवेकर, सोसायटी संचालक रमेश सोनवणे, मारुती कोळेकर, जयराम खेंगले, लक्ष्मण शिवेकर, यशवंत शिवेकर, संचालक जिजाभाऊ शिवेकर, तात्याभाऊ शिवेकर, मयुर मोरे, महादेव शिवेकर, सुभाष शेळके, सत्यवान खेंगले, विकास शिवेकर, अजित शिवेकर, प्रकाश शिवेकर, पोपट शिवेकर, तुकाराम साकोरे, काळूराम वाघमारे, अनिल शिवेकर व ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते. तसेच शिवे ग्रामपंचायत सरपंच ज्ञानेश्वर शिवेकर, उपसरपंच कविता शिवेकर, सदस्य अक्षय शिवेकर, आनंद साकोरे, निर्मला कोळेकर, विनायक शिवेकर, ललिता गडदे सभागृहात उपस्थित होते.
पॅनलप्रमुखांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावचा सर्वांगीण विकास करणेसाठी कटिबद्ध असून पुढील काळात पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, रस्ते, वीज, शिक्षण यावर सर्वांचे मार्गदर्शनातून काम करणार असल्याचे उपसरपंच कविता शिवेकर यांनी सांगितले.