कुरकुंडी येथील राष्ट्रीय विद्यालयाचा स्नेहमेळावा राजगुरूनगर येथे संपन्न

२३ वर्षांनी जुने विद्यार्थी आले एकत्र : शालेय जीवनातील आठवणींना उजाळा

कुरकुंडी येथील राष्ट्रीय विद्यालयाचा स्नेहमेळावा राजगुरूनगर येथे संपन्न

राजगुरूनगर : कुरकुंडी (ता.खेड) येथील राष्ट्रीय विद्यालयात सन २००० ते २००१ मध्ये इयत्ता दहावीत शिकत असलेल्या माजी विद्यार्थी व शिक्षकांचा स्नेहमेळावा राजगुरुनगर येथे नुकताच संपन्न झाला.

राष्ट्रीय विद्यालयात दहावी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी तब्बल २३ वर्षांनी स्नेहमेळावा निमित्ताने एकत्र आले.यावेळी अनेकांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.तर काहींनी आपल्या आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली. शिक्षकांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांची विचारपूस केली.अनेक विद्यार्थी उद्योजक झाले असून काहींचे व्यवसाय मोठे आहेत.

आपले वय,पद,प्रतिष्ठा आणि कामाचा व्याप बाजूला ठेवून चाळीशी कडे झुकलेले हे सर्व माजी विद्यार्थी अगदी उत्साहाने एकत्र जमले.त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. अनेक वर्षांनंतर आपण एकत्र भेटत आहोत.त्यामुळे ओळख लागते की नाही ही मनातील भावनाही होतीच;पण एकत्र आले आणि सर्वांनीच ओळख होताच गळाभेट घेतली.

कुरकुंडी,आसखेड बुद्रुक,कोरेगाव बुद्रुक व कोये गावचे अनेक विद्यार्थी स्नेहमेळाव्यात सहभागी झाले असून सस्कृंती जपण्यासाठी हा स्नेहमेळाव्याचा प्रयत्न केला.अशी माहिती कुरकुंडी माजी ग्रा.पं.माजी सदस्य महेंद्र पडवळ यांनी दिली.