Khed | पिंपरी बु विकास सोसायटीच्या चेअरमनपदी बाळासाहेब सीताराम ठाकूर यांची बिनविरोध निवड
व्हाईस चेअरमनपदी विठ्ठल बाबुराव भुजबळ यांची निवड
राजगुरूनगर : खेड तालुक्याच्या सहकार क्षेत्रातील महत्वाच्या पिंपरी बुद्रुक विकास सोसायटीच्या चेअरमनपदी बाळासाहेब सीताराम ठाकूर तर व्हाईस चेअरमनपदी विठ्ठल बाबुराव भुजबळ यांची बिनविरोध निवड झाली.निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध झाल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.
सोसायटीचे संचालकांना चेअरमन व व्हा.चेअरमनपदाची संधी मिळावी म्हणून सोसायटीचे सर्जेराव ठाकूर यांनी चेअरमनपदाचा तर चंद्रकांत वाळुंज यांनी व्हा. चेअरमनपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त दोन्ही पदांची निवडणूक राजगुरूनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात निवडणूक अधिकारी सुभद्रा बगाटे यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
चेअरमनपदासाठी बाळासाहेब ठाकूर यांचा व व्हाईस चेअरमनपदासाठी विठ्ठल भुजबळ यांचाच एकमेव अर्ज दाखल झाल्याने दोन्ही पदांची निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा बगाटे यांनी सदस्यांच्या उपस्थितीत जाहीर केले.निवडीनंतर नवनिर्वाचित चेअरमन व व्हा.चेअरमन यांचा शाल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला.निवडणुकीचे प्रशासकीय कामकाज सोसायटीचे सचिव राघू ठाकूर यांनी पाहिले.
निवडणूक प्रसंगी सभागृहात सोसायटीचे संचालक सर्जेराव ठाकूर,चंद्रकांत वाळुंज,मारुती वाळुंज,अंकुश काळे,कैलास ठाकूर,किसन भोंडवे, दत्तात्रय ठाकूर,नंदकुमार रिठे, सरस्वती ठाकूर,मंगल हुंडारे उपस्थित होते. नवनिर्वाचित अध्यक्ष ठाकूर व उपाध्यक्ष यांचा सत्कार बाजार समिती संचालक जयसिंग भोगाडे, माजी अध्यक्ष पांडुरंग ठाकूर,माजी सरपंच मच्छिन्द्र भुजबळ, रमेश ठाकूर,प्रभाकर वाळुंज,बाळासाहेब ठाकूर,ज्ञानेश्वर ठाकूर, संदीप भालेराव व संचालक यांचे हस्ते करण्यात आला.
