उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राजगुरूनगर सेवा दिवस साजरा
विश्व् हिंदू परिषद संचलित वनवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या वस्तूचे वाटप
राजगुरूनगर : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस सेवा दिवस म्हणून राजगुरूनगर येथील विश्व् हिंदू परिषद संचलित वनवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले भांडी साहित्य वाटप करून साजरा करण्यात आले.हा स्तुत्य उपक्रम पुणे जिल्हा भाजपचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी राबविला आहे.
यावेळी भाजपचे खेड तालुकाध्यक्ष शांताराम भोसले,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पै.काळुराम पिंजन,माजी तालुकाध्यक्ष दिलीप वाळके,जिल्हाउपाध्यक्ष संजय रौधळ,राजगुरूनगर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष शिवाजी मांदळे,नगरसेवक किशोर ओसवाल, रफिक मोमीन,नंदा जाधव,निलेश घुमटकर,राजेंद्र जाधव,तालुका उपाध्यक्ष सुनील देवकर,भांबोली उपसरपंच शरद निखाडे आदीसह वस्तीगृह अधीक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानुसार वाढदिवस सेवा दिवस म्हणून आम्ही भाजपा पक्षाचे वतीने वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना आवश्यक आणि स्वयंपाकाची भांडी देऊन त्यांचा वाढदिवस साजरा केला.राज्याला कणखर उपमुख्यमंत्री फडणवीस लाभले असल्याचे शरद बुट्टे पाटील यांनी सांगितले.यावेळी अनेकांची भाषणे झाली.सूत्रसंचालन सुनील देवकर यांनी केले.
