Khed | उज्जैन महाकाल देवदर्शन यात्रा संपन्न ; विनया मुंगसेंना महिलांचा वाढता पाठिंबा

मी सेवेकरी सोशल फाऊंडेशन’ आणि ‘सुधीर मुंगसे मित्रपरिवाराकडून आयोजन

Khed | उज्जैन महाकाल देवदर्शन यात्रा संपन्न ; विनया मुंगसेंना महिलांचा वाढता पाठिंबा

 

महावार्ता लाईव्ह | ‘मी सेवेकरी सोशल फाऊंडेशन’ आणि ‘सुधीर मुंगसे मित्रपरिवार’ यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आयोजित उज्जैन महाकाल ज्योतिर्लिंग दर्शन यात्रा १० नोव्हेंबरपासून १२ नोव्हेंबरपर्यंत मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने यशस्वीरीत्या पार पडली.

 

या यात्रेदरम्यान महिलांनी श्री महाकालेश्वर मंदिरासह कालभैरव व मंगलनाथ मंदिर यांसारख्या पवित्र स्थळांचे दर्शन घेतले. संपूर्ण प्रवास निःशुल्क रेल्वेमार्गे सोयीस्कर रीतीने पूर्ण झाला. उज्जैन येथे मनोरंजनपर कार्यक्रम संगीत रजनी आणि भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भाविकांनी या कार्यक्रमाचा सुद्धा मोठ्या उत्साहाने आनंद घेतला.

 

स्त्रीशक्तीचा आदर, तिच्या त्यागाचा सन्मान आणि तिच्या आध्यात्मिक भावविश्वाला जोड देण्याचा एक प्रामाणिक उपक्रम म्हणून ही यात्रा निर्णायक ठरली, असा विश्वास यावेळी कुरुळी - आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ. विनयाताई सुधीर मुंगसे यांनी व्यक्त केला. 

 

महिलांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या यात्रेचे पुढील टप्प्यात पुनरायोजन करण्याची तयारी आयोजकांनी व्यक्त केली आहे. ही महाकाल दर्शन यात्रा महिलांच्या श्रद्धेला नवसंजीवनी देणारी आणि समाजातील स्त्रीशक्तीला अभिवादन करणारी ठरल्याचे मत सहभागी भाविकांनी व्यक्त केले.