आळंदी व देहू पालखी सोहळ्यास रथाला जुंपण्यात येणाऱ्या मनाच्या बैलांची पशुवैद्यकीय डॉक्टर कडून तपासणी व औषध वाटप

आळंदी व देहू पालखी सोहळ्यास रथाला जुंपण्यात येणाऱ्या मनाच्या बैलांची पशुवैद्यकीय डॉक्टर कडून तपासणी व औषध वाटप

आळंदी : श्री क्षेत्र आळंदी येथून निघणारा संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा व श्री क्षेत्र देहू येथून निघणारा संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा या दोन्ही रथासाठी बैलजोडी  जुंपणण्याचा मान यावर्षी आळंदी येथील भोसले कुटुंब व देहू येथील मोरे कुटुंबास मिळाला आहे. गेल्या आठवड्यापासून दररोज पशुसंवर्धन विभागामार्फत या मानकरी बैलांची तपासणी केली जात आहे. 

आळंदी व देहू येथे आज खेड पंचायत समिती येथील पशुधन विकास अधिकारी डॉक्टर योगेश शेळके व चाकणचे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर दिपक औताडे , स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर नम्रता आंबेकर,पाचपुते, कुंभार उपस्थित होते.  रथाला जुंपण्यात येणाऱ्या बैलांची आरोग्य तपासणी केली. दोन्ही रथाचे बैल तंदुरूस्त असून खुपच मोहक आहेत. तसेच पालखी मार्गामध्ये पशुधनाची कोण कोणती काळजी घ्यायची याबद्दल माहिती दिली विशेष बाब म्हणून देवाची बैल असल्याने नैवेद्य देण्याचा प्रघात असतो तो टाळावा किंवा त्रास झाल्यास कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात याबद्दल माहिती दिली.

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर परिहार,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर गर्जे हे पालखी मार्गावर लक्ष ठेवून बैलांची तपासणी करतील .तसेच संपूर्ण पालखी मार्गामध्ये पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर उपलब्ध असल्याचे व त्यासाठी ड्युटी लावल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. 

Virbac कंपनीचे सीनियर बिजनेस मॅनेजर डॉक्टर बळीराम कारेगावकर यांनी त्यांच्या कंपनीमार्फत पालखीच्या बैलांना पालखी मार्गामध्ये उपयोगात येणारी विविध प्रकारची औषधे उपलब्ध करून दिलेली आहेत.