Khed | सावरदरीच्या सरपंचपदी संदीप पवार बिनविरोध

तालुक्यात विकास प्रक्रियेने गाव पुढे जाण्यासाठी प्रयत्न करणार आहे - नवनिर्वाचित सरपंच संदीप पवार

Khed | सावरदरीच्या सरपंचपदी संदीप पवार बिनविरोध

 

पुण्याच्या खेड तालुक्यातील स्मार्टग्राम पुरस्कारप्राप्त सावरदरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष संदीप बाळासाहेब पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर ग्रामस्थांनी पवार यांची डीजे लावून व गुलालाची मुक्तपणे उधळण करीत गावातून मिरवणूक काढली. सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.


ठरल्याप्रमाणे सर्वांना सरपंचपदाची संधी मिळावी म्हणून आपली मुदत संपताच मीरा कदम यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिला.त्यामुळे रिक्त सरपंचपदाची निवडणूक सावरदरी  ग्रामपंचायत सभागृहात निवडणूक अधिकारी तथा करंजविहिरे मंडलाधिकारी राजेंद्र वडणे यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सरपंचपदासाठी संदिप पवार यांचाच एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा सभागृहात वडणे यांनी सदस्यांच्या उपस्थितीत केली. वडणे यांना निवडणुकीचे कामात मदत ग्रामपंचायत अधिकारी श्रीधर नाईकडे व तलाठी निंबाळकर मॅडम यांनी केली.


निवडणूक प्रसंगी सभागृहात मावळत्या सरपंच मीरा कदम, उपसरपंच संदिप मेंगळे,माजी सरपंच व सदस्य भरत तरस,ग्राम. सदस्या निता शेटे, ताराबाई शेटे, बारकाबाई गावडे, पोलिसपाटील राहुल साकोरे, उद्योजक सोमनाथशेठ तरस, मच्छिंद्र शेटे, दत्तात्रय बुचूडे, उत्तम शेटे, विष्णू शेटे, हिरामण शेटे, गणपत साकोरे,अंकुश कदम, विश्वास धोंडगे, सुरेश पवार, श्रीहरी सोनवणे, काशिनाथ बोत्रे, भगवंत शिंदे, निवृत्ती पवार, बाबुराव शेटे,बाजीराव बोत्रे,शंकर पवार, राजाराम शेटे,धोंडीबा सोनवणे, तुकाराम बोत्रे,गणपत बुचूडे, काळुराम शेटे, तुकाराम सोनवणे व गावातील जेष्ठ,तरुण व महिला उपस्थित होते. निवडीनंतर डीजे लावून पवार यांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. सरपंचपदाची निवडणूक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. निवडणूक बिनविरोध झाल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.


एमआयडीसी टप्पा क्रमांक दोन क्षेत्रात सावरदरी गाव असून गावातील नागरिकांना अनेक सुविधा निर्माण करून लोकोपयोगी कामे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्यांसह ग्रामस्थांना विश्वासात घेऊन करणार आहे. गावातील नागरिकांना उच्च दाबाने पाणीपुरवठा केला जाईल. ओला व सुका कचरा व्यवस्थापन करून गाव कचरामुक्तसाठी प्रयत्न असून तालुक्यात विकास प्रक्रियेने गाव पुढे जाण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
- संदीप पवार - नवनिर्वाचित सरपंच सावरदरी