पाळू ग्रामपंचायत कार्यालय मध्ये महात्मा गांधी यांची जयंती साजरी.
राजगुरूनगर-प्रतिनिधी
2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने ग्रामपंचायत कार्यालय पाळू येथे त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांची जयंती साजरी करण्यातआली.
या प्रसंगी पाळू गावचे सरपंच कुंदा सावंत उपसरपंच संतोष गुरव माजी सरपंच सीताराम गायकवाड व सदस्य सुधाकर केदारी,अश्विनी केदारी व ग्रामसेवक एस.टी.बाईक तसेच ग्रामस्थ तरुण वर्ग महिला भगिनी उपस्थित होते. या निमिताने सर्वानी राष्ट्रपिता महत्मा गांधी यांनी जगाला अहिंसा व मानवतेची जी शिकवण दिली आहे त्या नुसार आचरण करण्याचा संकल्प केला.
------------------------------------------------
