राजगुरूनगर येथील पीडित कुटुंबाला ढूम्या गिरीभ्रमण ग्रुपकडून मदत
सामाजिक बांधिलकी म्हणून राजगुरूनगर येथील पीडित मकवाने कुटुंबाला रोख १७ हजार रुपयांची मदत
महावार्ता लाईव्ह | सामाजिक बांधिलकी म्हणून राजगुरूनगर येथील पीडित मकवाने कुटुंबाला रोख १७ हजार रुपयांची मदत ढूम्या गिरीभ्रमण ग्रुपच्या सदस्यांनी केली. मदत मिळाल्याने मकवाने कुटुंबाने ढूम्या ग्रुपचे आभार व्यक्त केले. परंतु पीडित कुटुंब या धक्क्यातून अजूनही सावरलेले नाही.
मागील महिन्यात एका नराधमाने मकवाने कुटुंबातील दोन लहान मुलीवर अत्याचार करून त्यांचा खून केल्याची घटना घडली. गोसावी समाजातील हे कुटुंब कामाच्या निमित्ताने राजगुरूनगर येथे वास्तव्यास आहे.सामाजिक बांधिलकी म्हणून या पीडित कुटुंबाला समाजातील अनेकांनी आर्थिक मदत केली. तसेच शासनाचे महसूल व पोलीस विभागाने देखील भरघोस आर्थिक मदत केली. आपण देखील समाजाचे काहीतरी देने लागतो या भावनेतून ढूम्या गिरीभ्रमण ग्रुपच्या अनेक सदस्यांनी आर्थिक मदत जमा केली. एकूण जमा झालेले १७ हजार रुपये ढूम्या ग्रुपचे सदस्यांनी सोमवारी (दि.६) रोजी मकवाने कुरुंबाच्या घरी जाऊन दिली.
मकवाने कुटुंबाला मदत देताना माजी उपसरपंच व ढूम्या ग्रुपचे अध्यक्ष नामदेव चव्हाण, उद्योजक माऊली करंडे, हुतात्मा राजगुरू फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब सांडभोर, महादेव घुले, सुरेश कातळे, अजित डोळस, सोपान राक्षे, अभिजित होले, कैलास मुसळे, रोहिदास होले, जयंत घोरपडे, कैलास दुधाळे, विशाल राक्षे, नरेंद्र सावंत, गणपत पाटोळे, पांडुरंग राऊत आदी उपस्थित होते.
ढूम्या गिरीभ्रमण ग्रुपने कोल्हापूर,सांगली जिल्ह्यातील पंचगंगा नदीला पूर येऊन तेथील अनेकांच्या घरात पाणी घुसले होते. त्यावेळी नर्सिंहवाडी येथील अनेक कुटुंबाला प्रत्यक्ष जाऊन रोख लाखाची मदत केली होती. सामाजिक बांधिलकी म्हणून रस्त्यावरील खड्डे मुरूम टाकून बुजविले. डोंगरावर वृक्षारोपण केलेली अनेक झाडे मोठी केली आहेत. डोंगरावरील मोरांना पाणी व अन्न टाकले जाते. पीडित मकवाने कुटुंबाला देखील सामाजिक बांधिलकी या भावनेतून सर्वांनी आर्थिक मदत केली.
माऊलीशेठ करंडे - उद्योजक राजगुरूनगर
नामदेव चव्हाण - अध्यक्ष ढूम्या ग्रुप
