Shirir| पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक

पुण्यातील महंमदवाडी येथील निवासस्थानी बांदल यांची सुमारे १६ ते १७ तास चौकशी केल्यानंतर ईडीने रात्री उशिरा त्यांना ताब्यात घेऊन मुंबई कार्यालयामध्ये घेऊन गेले आहेत.

Shirir| पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक

पुणे :  जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांना ईडीने बेकायदा आर्थिक व्यवहार (मनी लाॅड्रिंग) प्रकरणी अटक केली आहे. त्यांच्या शिक्रापूर बुरुंजवाडी, तसेच महंमदवाडी येथील निवासस्थानांवर सक्त वसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकांनी छापे टाकून कागदपत्रे जप्त करण्यात आली.

 

यापूर्वी बांदल यांच्याविरुद्ध प्राप्तीकर विभागाने कारवाई केली होती. बांदल यांच्या बंँक खात्यांची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी घेतली.बांदल यांच्याविरुद्ध पुणे पोलिसांनी एका प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाला धमकावल्याप्रकरणी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली होती. बांदल यांच्याविरुद्ध शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

बांदल यांनी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवली होती. मात्र, बांदल यांची गु्न्हेगारी पार्श्वभूमी विचारात घेऊन त्यांची उमदेवारी रद्द करण्यात आली होती.

 

शिरुर विधानसभा मतदार संघातून बांदल निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. बांदल यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.