Khed Taluka | जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी शिवसेना शिंदेगटाचे 'काही ठिकाणी उमेदवार ठरले..!

शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा परिषद-पंचायत समिती उमेदवारांच्या मुलाखती संपन्न

Khed Taluka | जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी शिवसेना शिंदेगटाचे 'काही ठिकाणी उमेदवार ठरले..!

 

महावार्ता लाईव्ह | आगमी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यात शिवसेना पक्षाच्या वतीने नीलकमल मंगल कार्यालयात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतींना खेड तालुक्यातून तब्बल ४२ इच्छुक उमेदवारांनी हजेरी लावली.

 

खेड तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचे सुतवोच शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर यांनी दिली. याबाबत अधिकृत उमेदवारी लवकरच जाहीर करण्यात येईल अशी ही माहिती जिल्हाप्रमुख पोखरकर यांनी दिली.

 

याच मेळाव्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीत भगवा फडकवणाऱ्या चाकण नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा श्रीमती मनीषाताई सुरेशभाऊ गोरे यांच्यासह नवनिर्वाचित १४ नगरसेवक, राजगुरुनगर नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री मंगेश गुंडाळ यांच्यासह नवनिर्वाचित १२ नगरसेवक आणि आळंदी शहरातील ४ नगरसेवकांचा विशेष सन्मान करण्यात आला. शिवसेनेच्या या यशाने तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट उसळली आहे.

 

जिल्हा परिषद निवडणूक व पंचायत समिती मुलाखती दिलेले उमेदवार पुढील प्रमाणे - 

▪️वाडा वाशेरे जिल्हा गट - डॉ. संतोष सुपे, सुधीर भोमाळे 
वाडा पंचायत समिती गण- मनीषा हिले
वाशेरे पंचायत समिती गण - रोहिदास मेठल 

▪️ चास कडूस जिल्हा परिषद गट-  आयात किंवा स्वपाक्षीय उमेदवार देणार

कडूस पंचायत समिती गण- चांगदेव ढमाले 
चास पंचायत समिती गण - सुजाता राऊत

▪️वाफगाव रेटवडी जिल्हा परिषद गट - रोहिणी गणेश थिगळे 

वाफगाव पंचायत समिती गण - वैभव गावडे 
रेटवडी पंचायत समिती गण -  आयात किंवा स्वपाक्षीय उमेदवार देणार


▪️ शेलपिंपळगाव- मरकळ जिल्हा परिषद गट - 
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे, व श्रीनाथ लांडे

मरकळ पंचायत समिती गण - प्रसाद घेनंद 
शेळपिंपळगाव पंचायत समिती गण - डॉ. शैलेश मोहिते यांच्या पत्नी 

▪️ पाईट - आंबेठाण जिल्हा परिषद गट - रत्नमाला कैलास गाळाव 

पाईट पंचायत समिती गण - जया रणजित भोकसे 
आंबेठाण पंचायत समिती गण - आयात किंवा स्वपाक्षीय उमेदवार देणार


▪️ मेदनकरवाडी-काळुस जिल्हा परिषद गट - आयात किंवा स्वपाक्षीय उमेदवार देणार

काळुस पंचायत समिती गण - नवनाथ कड, भाऊसाहेब जरे
मेदनकरवाडी पंचायत समिती गण -  जगदीश मॅडणकर, गणेश भुजबळ, संजय वाघमारे


▪️ कुरुळी-आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गट- 
शिवसेनेचे तालुकाप्रमुख निलेश पवार यांच्या पत्नी तनुजा निलेश पवार

कुरुळी - आयात किंवा स्वपाक्षीय उमेदवार देणार     आळंदी ग्रामीण - आयात किंवा स्वपाक्षीय उमेदवार देणार

▪️ नाणेकरवाडी - महाळुंगे -आयात किंवा स्वपाक्षीय उमेदवार देणार

 

या मेळाव्याला खेड तालुक्यातील शिवसैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेना उपनेते तथा संपर्कप्रमुख  इरफानभाई सय्यद, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी सभापती भगवान शेठ पोखरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य, शिवसेना नेते अतुल देशमुख, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नगरसेवक नितीन गोरे, शिवसेना तालुकाप्रमुख निलेश पवार, उपजिल्हाप्रमुख प्रकाश वाडेकर, तालुका संघटक महादेव लिंभोरे पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख धनंजय बापू पठारे, युवासेना तालुकाप्रमुख विशाल आप्पा पोतले, चाकण शहरप्रमुख महेश शेवकरी, आळंदी शहरप्रमुख राहुल चव्हाण तसेच तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत खेड तालुक्यातून शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. शिवसैनिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे मेळावा उत्साहपूर्ण पार पडला.