Rajgurungar | इंग्रजी मध्यामिक विद्यालयात गुरुपौर्णिमा निमित्ताने ग्रंथदिंडीचे आयोजन

टाळ,मृदुंग,लेझीमच्या निनाद करत भावभक्तीचा गजरात आठवीचे विद्यार्थ्यांनी ठेका धरला | विद्यार्थ्यांकडून आई-वडिलांचे पाद्यपूजन

Rajgurungar | इंग्रजी मध्यामिक विद्यालयात गुरुपौर्णिमा निमित्ताने ग्रंथदिंडीचे आयोजन

राजगुरूनगर : येथील खेड तालुका एज्युकेशन सोसायटी संचालित इंग्रजी मध्यामिक विद्यालयात गुरुपौर्णिमा व व्यासपौर्णिमादिनी ग्रंथदिंडी काढून गुरुपौर्णिमा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

 

संस्थेचे अध्यक्ष हरिभाऊ सांडभोर,उपाध्यक्ष अजित लुणावत, सेक्रेटरी एअर कमोडर गणेश जोशी,इंग्रजी माध्यम शाला समिती अध्यक्ष डॉ.प्रदीप शेवाळे यांनी उपस्थित राहून मनोगत व्यक्त केले. संस्थेचे संचालक स्वानंद खेडकर व माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मनिषा भुजबळ,पर्यवेक्षिका ज्योती राठोड, अनुराधा गायकवाड,प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अनिता गुजराथी,पर्यवेक्षिका सुनीता पवार यांच्या हस्ते विविध ग्रंथांनी सजलेल्या पालखीचे पूजन करून ग्रंथदिंडी सोहळ्याची सुरुवात केली.

 

विद्यालयाचे क्रिडांगण टाळ,मृदुंग,लेझीमच्या निनादाने भारावून गेले होते.भावभक्तीचा गजर करत आठवीचे विद्यार्थ्यांनी ठेका धरला होता.तर दहावीच्या विद्यार्थ्यांनी खेळल्या जाणाऱ्या विविध फुगड्या सादर केल्या.साक्षी मुद्रांकित यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथ दिंडी विषयी माहिती सांगितली.गुरुपौर्णिमेनिमित्त इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचे पाद्यपूजन केले.सीमा आनंदे यांनी विद्यार्थ्यांना व्यासपौर्णिमेविषयी माहिती दिली.

 

विद्यालयात झालेल्या पाद्यपूजनाच्या कार्यक्रमाचे पालकांनी कौतुक केले.पालकांनी देखील विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेनिमित्त अनमोल मार्गदर्शन केले.विद्यार्थी,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.भक्तिमय व भारावलेल्या वातावरणात कार्यक्रम सोहळा संपन्न झाला.