सरपंच अनिता मांजरेंनी सांडभोरवाडी - काळुस जि.प.गटातून निवडणुकिसाठी दंड थोपटले

सांडभोरवाडी - काळुस हा जिल्हा परिषद गट विकासाचे मॉडेल बनविणार : सरपंच अनिता मांजरे

सरपंच अनिता मांजरेंनी सांडभोरवाडी - काळुस जि.प.गटातून निवडणुकिसाठी दंड थोपटले
सरपंच अनिता मांजरेंनी सांडभोरवाडी - काळुस जि.प.गटातून निवडणुकिसाठी दंड थोपटले
सरपंच अनिता मांजरेंनी सांडभोरवाडी - काळुस जि.प.गटातून निवडणुकिसाठी दंड थोपटले

Anita Vilas Manjre zp election pune 

महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यातील मांजरेवाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ.अनिता विलास मांजरे यांनी सांडभोरवाडी - काळुस जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविण्यासाठी दंड थोपटले आहे.

 

अनिता मांजरे या मांजरेवाडी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत पहिल्यांदा लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या. दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत देखील लोकनियुक्त सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. सरपंचपदाच्या कार्यकाळात त्यांनी गावात अनेक लोकोपयोगी कामे यशस्वीपने मार्गी लावली असून अनेक कामे सुरु आहेत. 

 

अनिता मांजरे यांचे पती विलास मांजरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. सरपंच मांजरे यांनी ग्रामपंचायत निधी व पक्षाच्या माध्यमातून गावात अनेक कामे केली आहेत. माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक कार्यकर्ते म्हणून ते संपूर्ण तालुक्यात परिचित असून हाडाचा कार्यकर्ता अशी विलास मांजरे यांची ओळख आहे.

 

जिल्हा परिषद व पंचायत समितीचे वारे वाहू लागले असून अनेकांनी सांडभोरवाडी - काळुस जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविण्यासाठी शडू ठोकले आहेत. निवडणुकीसाठी अनेकांनी काही क्लूप्त्या लढवून वाढदिवस साजरे करताना मोठी पब्लिक गर्दी जमवून वाढदिवस लोकांच्या नजरेस भरेल असा थाटामाटात साजरा केला.

 

सरपंच अनिता मांजरे यांनी देखील गावागावात संपर्क करून गुप्त बैठकांचे सत्र सुरु केले. मांजरे यांचा असलेला दांडगा जनसंपर्क व गटाच्या परिसरात त्यांचे नात्यागोत्यांचे मोठे जाळे आहे. तसेच गावात केलेले काम ह्या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. मांजरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी तीव्र इच्छुक आहेत. एकंदरीत मांजरे निवडणुकीत तगडे आव्हान निर्माण करू शकतात यामध्ये तिळमात्र शंका नाही.


सांडभोरवाडी - काळुस जिल्हा परिषद गटातून आपण निवडणूक पक्षाच्या माध्यमातून लढविणार आहे. निवडणुकीत विजय संपादन करण्याची क्षमता आहे. गटातील विकासकामांना प्राधान्य देऊन गट विकासाचे मोडेल बनविले जाईल.
अनिता विलास मांजरे - लोकनियुक्त सरपंच मांजरेवाडी