राजगुरू महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात जागृती अभियानाचे आयोजन
नेस वाडीया महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो. डॉ. प्रकाश चौधरी विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करणार
राजगुरुनगर : खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचालित हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० संदर्भात स्कूल कनेक्ट हे संपर्क अभियान राबविण्यात येणार असून त्या अंतर्गत पदवीच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी जागृती अभियानाचे आयोजन शुक्रवार दि. २८ जून रोजी सकाळी १० वा. करण्यात आल्याची माहिती संस्थाध्यक्ष ॲड देंवेंद्र बुट्टेपाटील यांनी दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनांंनुसार स्कूल कनेक्ट या कार्यक्रमांतर्गत पुण्याच्या नेस वाडीया महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो. डॉ. प्रकाश चौधरी हे विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करणार आहेत. या अभियानातून विद्यार्थी आणि पालकांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात जागरूक करून त्यांच्या शंकाचे निरसण करण्यात येणार आहे. विद्यार्थी व पालकांनी या अभियानास उपस्थित राहून शैक्षणिक धोरण समजून घेण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. शिरीष पिंगळे यांनी केले आहे.
