Chakan MIDC Industries Face Relocation Threat | कारखानदारांनी आपले उद्योग स्थलांतरित करण्याचा घेत असलेला निर्णय ; त्यांचं चुकलं काय ?
चाकण एमआयडीसी क्षेत्रातील रस्त्यांवर ट्रॅफिक चक्काजाम ; वाहनांच्या लागल्या रांगा ; जागोजागी रस्त्याला खड्डेचखड्डे, रस्त्यांची खराब अवस्था, खड्ड्यात पावसाचे पाणी,वाहन चालकांचे होतात हाल
महावार्ता लाईव्ह | चाकण एमआयडीसी मधून अनेक उद्योजकांनी आपले कारखाने स्थलांतरित करण्याचा निर्णय घेत आहेत. याला कारण म्हणजे चाकण एमआयडीसीतील रस्त्यांना पडलेले खड्डेचखड्डे, रस्त्यांची झालेली दयनीय दुरावस्था, अनेक वर्ष रस्त्यांची दुरुस्ती नाही, अरुंद रस्त्ये, रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग आणि त्यातून सुटलेली दुर्गंधी, एमआयडीसी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढलेली गुंडगिरी, कामगारांना होणारी मारहाण व लूटमारीचे प्रकार, नित्याचीच वाहतूक कोंडी, ट्रॅफिक चक्काजाम, सुरळीत वीज पुरवठ्याची बोंबाबोंब अशा असंख्य कारणाला वैतागून चाकण एमआयडीसी क्षेत्रातील अनेक उद्योजकांनी आपले कारखाने अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्याचा निर्णय घेत आहेत.

जगाच्या नकाशावर झळकत असलेल्या चाकण एमआयडीसी मध्ये कारखानदारीला पोषक वातावरण नसेल तर उद्योजकांचे चुकले काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारखानदारीला वीज, रस्त्ये,पाणी,सुरक्षितता आणि पोषक वातावरण या महत्त्वाच्या गोष्टी आहेत.चाकण एमआयडीसी मध्ये अनेक राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय नामांकित कंपन्या आहेत.आतापर्यंत एमआयडीसीचे पाच टप्पे झाले असून सहाव्या टप्प्याची चर्चा सुरू आहे.येथील एमआयडीसी क्षेत्रातील कारखानदारीला अपेक्षित सुविधा नाहीत आणि कामगार वर्ग देखील सुरक्षित नसल्याची भावना या सर्व गोष्टीमुळे अनेक राष्ट्रीय बहुराष्ट्रीय कंपन्या चाकण एमआयडीसी मधून स्थलांतरित होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
जाहिरात

आशिया खंडात चाकण एमआयडीसी ऑटोमोबाईल हब म्हणून ओळखली जाते.येथील एमआयडीसी मध्ये वीज रस्ते पाणी या सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने सुरुवातीला पावले उचलली गेली आणि त्यानंतर झालेली रस्त्यांची दुरवस्था,नित्यनियमाने वाहतूककोंडी,ट्रॅफिक चक्काजाम यामुळे कारखानदारांना चाकण एमआयडीसी असुरक्षित वाटू लागली आणि याच कारणाने त्यांनी आपले उद्योग सातारा जिल्ह्यात हलविण्याचे प्रयत्न केले आहेत.
चाकण एमआयडीसी मधून एकेक कंपनी बाहेर गेली तर येथील उद्योग व्यवसाय ठप्प होतील.कामगारांच्या हाताला काम मिळणार नाही व कामगार वर्ग बेघर होईल.ज्या प्रमाणात गुंतवणूक झाली ती गुंतवणूक राहणार नाही.या सर्वांचा परिणाम चाकण एमआयडीसी उध्वस्त होण्याला वेळ लागणार नाही हे तितकेच सत्य आहे.

उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या बॉस म्हणून पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी तात्काळ उद्योजकांची बैठक घेऊन त्या ठिकाणी असणाऱ्या गैरसोयी दूर करण्याचे आश्वासन उद्योजकांना त्वरित दिले तर कंपन्या स्थलांतरित होणार नाहीत. पुणे जिल्ह्याचे नाव चाकण एमआयडीसीमुळे देशाच्या अग्रस्थानी राहिले आहे.स्व अजितदादा पवार यांनी त्यांच्या कल्पनेतून एमआयडीसीला चालना दिली.आज ते हयात नसताना मोठमोठे कारखाने स्थलांतरित होत आहेत ही बाब अतिशय दुर्दैवी आहे.
अजित पवार आज असते तर त्यांनी रस्त्यांची दुरवस्था होऊ दिली नसती आणि उद्योजकांना आवश्यक त्या सर्व सुविधा देण्याचा निर्धार केला असता. परंतु आज अजितदादा हयात नसताना उद्योजकांचे सुविधांअभावी हाल सुरू आहेत ही वस्तुस्थिती योग्य नाही. एमआयडीसी मधील झालेली परिस्थिती पाहून आणि अडचणीचा सामना करताना कारखानदार हातबल झाली आहेत.हे चित्र एमआयडीसीला लाजिरवाणेआहे.कचऱ्याचे ढीग त्यातून सुटलेली दुर्गंधी आणि परीसरातील नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहतो ते वेगळे.
एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली असून गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नाही. दिवसाढवळ्या हाणामाऱ्या, लूटमार आणि खुनाचे प्रकार घडत आहेत.पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि पोलीस मात्र आर्थिक तडजोडी करण्यात मग्न आहेत. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नाही. एमआयडीसी क्षेत्रामध्ये वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला आहे.या सर्व गोष्टीला कंटाळून कारखानदारांनी चाकण एमआयडीसी मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यांच्या या निर्णयाने महाराष्ट्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे.एमआयडीसीत सर्व सुविधा तात्काळ निर्माण करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी प्रशासनाला आदेश दिले आहेत. एमआयडीसी मध्ये कारखानदारांसाठी पाहिजे ते इन्फ्रास्ट्रक्चर उभारा अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. त्यांच्या सूचनेने प्रशासन हलले असून उद्योग मंत्री देखील येत्या रविवारी दि.१६/८/२०२६ रोजी चाकण एमआयडीसी मध्ये येत आहेत.कारखानदारांना काय आश्वासन सरकारकडून मिळणार हे पाहने महत्वाचे ठरणार आहे.