Khed Nivedak Association | खेड तालुका निवेदक असोसिएशनचा सत्कार समारंभ व स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

आदेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली नवी कार्यकारिणी; निवेदकांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प

Khed Nivedak Association | खेड तालुका निवेदक असोसिएशनचा सत्कार समारंभ व स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

 

महावार्ता लाईव्ह | खेड तालुका निवेदक असोसिएशनचा सत्कार समारंभ व स्नेह मेळावा नुकताच उत्साहात संपन्न झाला. या असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष आदेश टोपे यांच्यासह नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. स्नेहमेळाव्याला खेड तालुक्यातील तब्बल १०० ते १५० निवेदक उपस्थित होते.

 

खेड तालुका निवेदक असोसिएशन या संस्थेची नुकतीच स्थापना झाली. या असोसिएशनची नूतन कार्यकारिणी अध्यक्ष टोपे यांनी जाहीर केली. नूतन कार्यकारिणीचा सत्कार प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या सोहळ्याला तालुक्यातील जुन्या पिढीतील निवेदक तुकाराम वहिले, पठाणराव वाडेकर, शिवाजी पगडे, प्रकाश खराबी, गणेश डावरे, सुदाम येळवंडे, नरेंद्र गायकवाड व सोपान टोपे, सुनिल वाळुंज, धनंजय पठारे, संदिप बोत्रे, शरद वाबळे हे प्रमुख मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

 

 

यावेळी बोलताना प्रमुख व्याख्याते गणेश शिंदे म्हणाले की, "निवेदकाची भूमिका ही फुलांच्या हारातील धाग्याप्रमाणे अलिप्त असावी, तसेच मिळालेल्या यशाने हुरळून न जाता निवेदकांनी आपापसातील स्पर्धेपेक्षा एकमेकांना समजून घेण्यावर भर दिला पाहिजे. निवेदकाची मोठी ताकद आहे. निवेदकाने निवेदन म्हणून काम करताना कौशल्य विकसित केली पाहिजेत." असा सल्ला त्यांनी उपस्थित निवेदकांना दिला.

 

खेडचे ज्येष्ठ निवेदक नरेंद्र गायकवाड म्हणाले की, "निवेदकांनी काय बोलावे यापेक्षा काय बोलू नये याबाबत स्पष्ट आचारसंहिता असण्याची आणि निवेदकांसाठी 'संवाद भवन' उभारण्याची गरज आहे." असल्याची भूमिका स्पष्ट केली.

 

 

आपल्या अध्यक्षीय मनोगतात बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष आदेश टोपे म्हणाले की, "खेड तालुक्यातील सर्व निवेदकांना एका छताखाली आणून संघटित करणे आणि त्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी हेल्थ इन्शुरन्ससह कल्याणकारी योजना राबवणे हे असोसिएशनचे मुख्य उद्दिष्ट आहे. निवेदनाचे मानधन काय असावे हे असोसिएशन संस्थेने ठरविले नाही. मानधन किती घ्यायचे हा प्रत्येक निवेदकाच्या कौशल्याचा भाग आहे."

 

या कार्यक्रमाला खेड तालुक्यातील प्रसिद्ध निवेदिका पूजा थिगळे-गुंदेचा, आंबेगाव तालुक्याचे निवेदक निलेश पडवळ, अमित कातळे, मावळ तालुका निवेदक संघाचे अध्यक्ष अतुल सातकर, लक्ष्मण शेलार, उपाध्यक्ष अमोल सस्ते, रामदास वाडेकर, खेडचे जेष्ठ पत्रकार दत्ता भालेराव, राजेंद्र सांडभोर, कोंडीभाऊ पाचारणे, रुपेश बुट्टे, संतोष फडके, गणेश आहेरकर यासह संपूर्ण अनेक निवेदक मंडळींनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक असोसिएशनचे पदाधिकारी सूर्यकांत मुंगसे यांनी केले. सूत्रसंचालन बाळासाहेब घाटे व तुषार वाटेकर यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. सुदाम कराळे यांनी आभार मानले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वीतेसाठी असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्व निवेदकांनी संघटित उपस्थित राहून निवेदन क्षेत्राचा दर्जा उंचावण्याचा निर्धार या प्रसंगी व्यक्त केला.

 

निवेदक असोसिएशन खेड तालुका कार्यकारिणी

अध्यक्ष - आदेश टोपे
कार्यध्यक्ष - सुदाम कराळे
उपाध्यक्ष - बाळासाहेब घाटे, संदेश जाधव
सचिव - तुषार वाटेकर
सहसचिव - अमोल डावरे
खजिनदार - चेतन शिंदे

सल्लागार मंडळ - ज्येष्ठ सल्लागार - सूर्यकांत मुंगसे
कायदेशीर सल्लागार - अँड. संदिप देशमुख

संचालक मंडळ - कैलास घेणंद, आकाश बोंबले, संभाजी कड, चांगदेव ढमाले, नवनाथ मेदनकर, मुचकुंद जाधव, संपत टेमगिरे, अँड. सौरभ गव्हाणे, अशोक मांजरे, सौरभ केंदळे.