जालना जिल्ह्यातील कडवंची गावाला खेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिली भेट

जिल्हा नियोजन समिती सदस्य व भाजप जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांच्या पुढाकारातून शेतकरी सहलीचे आयोजन

जालना जिल्ह्यातील कडवंची गावाला खेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिली भेट

राजगुरुनगर : खेड तालुक्याचे अवर्षण प्रवण क्षेत्र असलेल्या वाफगाव,जऊळकेबुद्रुक,वरुडे,गोसासी,पुर,वाकळवाडी,गाडकवाडी,चीचबाईगाव या गावातील ३५ शेतकऱ्यांनी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शरद बुट्टे पाटील यांच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील कडवंची या पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमात यशस्वी काम केलेल्या गावाला मंगळवारी (दि.२५) भेट दिली.

 

 

१९९७ - ९८ मध्ये इंडो जर्मन अर्थसहाय्याने राबविण्यात आलेल्या पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमात या गावाने अत्यंत कमी प्रमाणात पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब विविध उपायोजनांच्या माध्यमातून अडविला आहे.त्यातून डोंगर माथा ते पायथा यानुसार वनविभाग १९ बंधारे आणि ६०० शेततळी या माध्यमातून पाण्याची साठवणूक करून १६०० एकर क्षेत्रामध्ये द्राक्ष बागा करून गावचे वार्षिक उत्पन्न ७५ लाखा वरून तब्बल ७१ कोटी पर्यंत नेले आहे.कडवंची या यशस्वी गावाची पाहणी करण्यासाठी आलेल्या वरील गावातील लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांनी गाव शिवाराला आज भेट दिली.यावेळी कडवंची गावचे माजी सरपंच चंद्रकांत शिरसागर यांनी शेतकऱ्यांना पाणलोट क्षेत्र विकासासह,पाण्याची साठवणूक,वापर आणि पीक पद्धती याबद्दल प्रत्यक्ष शिवार फेरी करत असताना माहिती दिली.

 

 

 

यावेळी बाजार समितीचे माजी संचालक कैलास टाकळकर, वाफगावचे सरपंच उमेश रामाने, गाडकवाडीचे सरपंच वैभव गावडे, चीचबाईगावचे माजी सरपंच संतोष गार्डी,  गोसासीचे सरपंच संतोष गोरडे,  जऊळके सोसायटी चेअरमन कचर येवले,  वरूडेचे माजी सरपंच दिलीप चौधरी, अतुल कुऱ्हाडे, शेतकरी संतोष गोरडे, अमर गोरडे , धोंडिभाऊ शिंदे, गोरक्ष गोरडे, पांडुरंग रणपिसे, संतोष रणपिसे,कैलास गरुड,गोपाळ पवळे,दिलीप चौधरी, शमशुउद्दीन इनामदार, संतोष तांबे,राहुल गावडे, अभिषेक सरडे, शिवाजी गावडे,तान्हाजी रणपिसे,कचरू गाडगे,अमर रणपिसे, नवनाथ गावडे,संतोष थिटे यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते.

 

खेड तालुक्यातील कळमोडी प्रकल्पाचे पाणी मिळेल या आशेवरती वाफगाव परिसरातील ही गावे अनेक वर्ष बागायती शेतीचे स्वप्न पाहत आहेत.परंतु गेल्या अनेक वर्षात त्याला यश मिळाले नसून केवळ असे स्वप्न पहात बसत वेळ घालवण्यापेक्षा आता सुरू असलेली पाणलोट क्षेत्र विकासाची कामे उत्तम दर्जाची करून आणि पीक पद्धतीमध्ये बदल करून नफ्याची शेती शेतकरी करू शकतो हे लक्षात घेऊन आपण या अभ्यास सहलीचे आयोजन केल्याचे जिल्हा नियोजन समिती सदस्य व भाजप जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी सांगितले.