राष्ट्रवादी काँग्रेसने खेड पोलीस स्टेशन पर्यंत काढला मोर्चा ; शरद पवार यांच्या घरावरील झालेल्या हल्ल्याचा निषेध
खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचा राजगुरूनगर येथे निषेध मोर्चा
राजगुरूनगर : न्यूज नेटवर्क
खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राजगुरूनगर येथे जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ल्याचा कट केल्याबद्दल राजगुरूनगर शहरातून पोलीस स्टेशनपर्यंत निषेध मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने निषेध आंदोलनामध्ये सामील झाले होते. खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार मोहिते यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या मुंबई येथील निवास्थानी एसटी कर्मचा-यांनी अचानक आंदोलन करीत घराच्या दिशेने चपला दगड फेक करुन भ्याड हल्ला प्रकरणी सुत्रधारांना अटक करण्याची मागणी करत राजगुरूनगर येथे पोलीस स्टेशनवर आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतुत्वाखाली मोर्चा काढत निषेध मोर्चा काढण्यात आला.
यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील,पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष कैलास सांडभोर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, सभापती अरुण चौधरी, पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, कैलास लिंभोरे, सुरेखा मोहिते, संध्या जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य अनील राक्षे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष राजाराम लोखंडे, विलास कातोरे, अरुण मुळूक, दिलीप करंडे, शहराध्यक्ष सुभाष होले, अशोक राक्षे, मच्छिंद्र राक्षे, नवनाथ होले, वैभव नाईकरे, शांताराम सोनवणे, निवृत्ती नेहरे, बाळासाहेब सांडभोर, हिरामण सातकर, डी डी भोसले, गणेश बोत्रे, मंगल चांभारे, ॲड मनिषा टाकळकर, काळूराम कड, मयूर मोहिते पाटील, अरुण थिगळे, अजय भागवत व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हल्ल्यानंतर शरद पवार यांची प्रतिक्रिया
आम्ही आजही एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहोत. पण चुकीच्या नेतृत्वाच्या पाठी नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. जे काही घडले त्यावर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. नेता शहाणा नसेल तर कार्यकर्त्यांवर दुष्परिणाम होणारच. राजकारणात मतभेद असतात, संघर्ष असतात. पण टोकाची भूमिका घेण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही, असेही या हल्ल्यानंतर पवार म्हणाले होते.
एसटी कर्मचाऱ्यांकडून विरोध
एसटी कर्मचारी हातात दगड घेऊन आणि चपला घेऊन काल दिसून आले. यावेळी शरद पवार आणि अजित पवार यांना चोरांचे सम्राट म्हणत एसटी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. शरद पवार आमच्या विलीनीकरणाच्या आड आले. अशा प्रतिक्रिया एसटी कर्मचारी काल देत होते.
---------------------------------------------------------------------
