तळागाळातील सर्वसामान्य जनतेला कायद्याचे ज्ञान झाले पाहिजे : अँड.देविदास शिंदे पाटील
चाकण : प्रतिनिधी
समाजातील आर्थिक दुर्बल घटक परिस्थितीमुळे कोर्टात खटला चालविण्यासाठी वकील देऊ शकत नाहीत.अशा लोकांना लीगल एड म्हणून विधी सेवा समितीच्या वकिलामार्फत मोफत खटला चालविला जातो.बार असोसिएशनचे माध्यमातून आयोजित शिबिरातून कायदे तळागाळातील जनतेपर्यंत पोहचले पाहिजेत.असे प्रतिपादन खेड तालुका राजगुरूनगर वकीलबार असोसिएशनचे अध्यक्ष अँड.देविदास शिंदे पाटील यांनी केले.
'आजादी का अमृत महोत्सव' या अभियानातंर्गत खेड तालुका राजगुरूनगर बार असोसिएशनचे वतीने वराळे (ता.खेड) येथील ग्रामपंचायत सभागृहात आयोजित कायदेविषयक शिबिरात मार्गदर्शन करताना अँड.शिंदे बोलत होते.यावेळी सरपंच दिनेश लांडगे,असोसिएशनचे उपाध्यक्ष अँड.गणेश गाडे पाटील, सचिव संदीप गाडे,कार्यकारिणी सदस्य सोनाली पडवळ, आदिनाथ कड,अबूब पठाण व हंबीरराव विधी कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते.
शिबिरात ॲड.आदिनाथ कड यांनी लीगल लिटरसी राईट टू एज्युकेशन व फूड विषयी मार्गदर्शन केल.संध्या बवले यांनी हुंडाबळी या विषयावर कायदेशीर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सोनाली पडवळ यांनी केले.आभार सरपंच दिनेश लांडगे यांनी मानले.
------------------------------------------------------------------------------
