भाजपाच्या महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी शिवाकाली खेंगले यांची निवड

भाजपाच्या महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी शिवाकाली खेंगले यांची निवड

राजगुरूनगर : खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील पाईट ग्रामपंचायत सदस्या व विकास सोसायटीच्या माजी संचालिका आणि धडाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या शिवाकाली रामदास खेंगले यांची भाजपाच्या महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.

शिवाकाली खेंगले यांची महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी केल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे माजीमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते निवडीचे पत्र शिवाकाली खेंगले यांना पाईट येथे देण्यात आले.यावेळी माजीमंत्री बाळा भेगडे,पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुट्टे पाटील, जि.प.चे माजी सदस्य अतुल देशमुख, तालुकाध्यक्ष शांताराम भोसले,युवामोर्चा तालुकाध्यक्ष काळूराम पिंजन,देवदास बांदल,रोहित डावरे पाटील,संजय रौन्धळ आदी उपस्थित होते. 

पश्चिम भागात खेंगले यांचे सामाजिक कार्य मोठे असून त्या भाजपात येण्यापूर्वी शिवसेनेच्या पदाधिकारी होत्या. शिवसेना पक्षाला जय महाराष्ट्र करीत त्यांनी भाजपात प्रवेश केला.खेंगले हे राजकीय घराणे तालुक्याच्या पश्चिम भागात मोठे परिचित आहे.त्यांच्या प्रवेशाने भाजपची ताकद पश्चिम भागात वाढणार आहे.
---------------------------★★★------------------------------