Narayangaon illegal swords seized | नारायणगाव येथे १२ बेकायदेशीर तलवारी जप्त; जुन्नरचा तरुण सालीम साजिद पठाण अटक

Narayangaon ; धडाकेबाज कारवाई! नारायणगावमध्ये १२ तलवारींसह तरुण पोलिसांच्या ताब्यात ; तलवारी घेऊन नारायणगावकडे येत असताना सालीम साजिद पठाणला अटक

Narayangaon illegal swords seized | नारायणगाव येथे १२ बेकायदेशीर तलवारी जप्त; जुन्नरचा तरुण सालीम साजिद पठाण अटक

 

महावार्ता लाईव्ह | पुणे ग्रामीण जिल्ह्यात बेकायदेशीर शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई केली आहे.

 

नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना स्थानिक गुन्हे शाखा जुन्नर विभागाच्या पथकाला गोपनीय बातमी मिळाली की, सालीम साजिद पठाण (वय २०, रा. शिपाई मोहल्ला, जुन्नर) आपल्या सुझुकी एस्टीम गाडी (MH 12 DE 2767) ने नारायणगावकडे येत असून, गाडीत तलवारी आहेत.

 

बातमीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने नारायणगाव पोलिसांसोबत संयुक्त कारवाई करत संशयिताला ताब्यात घेतले. त्याची गाडी पंचासमक्ष झडती घेतली असता, गाडीतून १० मोठ्या तलवारी आणि २ लहान तलवारी अशा एकूण १२ बेकायदेशीर तलवारी जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी नारायणगाव पोलीस स्टेशन येथे  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जगदेव पाटील करत आहेत.