'कोविड काळात जनतेचा आधार शरद बुट्टे पाटील' अहवालाचे प्रकाशन

'कोविड काळात जनतेचा आधार शरद बुट्टे पाटील' अहवालाचे प्रकाशन

राजगुरूनगर : प्रतिनिधी
         पुणे जिल्हा परिषदेतील गटनेते शरद बुट्टे पाटील यांच्या 'कोविड काळात जनतेचा आधार' या अहवाल पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे,मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद,जिल्हा परिषदेचे सदस्य आशा बुचके, राणी शेळके,वीरधवल जगदाळे, प्रतापराव पाटील,दत्तात्रेय झुरुंगे या मान्यवरांचे हस्ते पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात संपन्न झाले.
         २०१९ मध्ये कोरोना व्हायरसची सुरवात झाली. त्याकाळी एखाद्या माणसाला कोरोनाची लागण झाली तर नात्यातील माणूस माणसाचे जवळ जात नव्हता आणि येत देखील नव्हता.अशा संकट काळात खेडच्या पिंपरी–पाईट जिल्हा परिषद गटाचे सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी एक नागरिक म्हणून गटातील जनतेसाठी विविध उपाययोजना निर्माण केल्याने अनेकांना आधार मिळाला.
       कोरोना रुग्णांसाठी काम करणाऱ्या आशा वर्कर यांना साडी भेट देऊन जीवनावश्यक किराणा किट दिले.९८ दिव्यांगांना प्रत्येकी १५ किलो धान्य घरपोच केले.आरोग्य केंद्रात साधनांची उपलब्धता निर्माण करून कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांना काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले. आरोग्य सेविका-सेवक,आशा वर्कर-मदतनीस तसेच  आरोग्य संस्था व कोविड सेंटरला मदत,लसीकरणाचे योग्य नियोजन करून अडचणीतून मार्ग काढले.अशा पद्धतीने गटात काम झाल्याने या कामाचा अहवाल म्हणून त्यांनी पुस्तिकेचे प्रकाशन केले.
         कोरोनाची लागण मला आणि माझ्या घरातील अनेक  सदस्यांना देखील झाली.परंतु लाखो रुपये खर्च करूनही  कोरोनाने आईचे निधन झाले.आईचे दुःख बाजूला सारून जनतेला आधार आणि त्यांना कोरोना काळात सुविधा मिळाव्यात म्हणून सातत्याने प्रयत्न केले.त्यामुळे अनेकांना मदत झाली.जनतेमुळे मिळालेल्या राजकीय शक्तीचा वापर आपण त्यांच्या संकट काळात अशा पद्धतीने केल्याचे शरद बुट्टे पाटील यांनी सांगितले.
-------------------------------------------------------------------------