कुरकुंडी येथे प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचे उदघाटन

केंद्र सरकारने शेतकरी हितासंबंधी घेतलेल्या अनेक योजनाविषयक व पीएम किसान योजना बाबत शेतकऱ्यांना माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी दिली.

कुरकुंडी येथे प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचे उदघाटन

राजगुरूनगर : खेड तालुक्यातील कुरकुंडी येथे प्रधानमंत्री किसान समृध्दी केंद्राचे उदघाटन शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत भाजपचे जिल्हाध्यक्ष  (उत्तर विभाग) शरद बुट्टे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.

या केंद्राच्या माध्यमातून केंद्र व राज्याच्या कृषी विषयक शेतकरी हिताच्या योजनांची माहिती आणि अंमलबजावणी केली जाणार आहे.शासनाच्या विविध योजनातील अनुदानावर उपलब्ध होणारी खते,बी-बियाणे,शेती विषयक औषध व कीटकनाशके या केंद्रावर अल्पदरात उपलब्ध होणार आहेत.तसेच माती परीक्षण, शेतकऱ्यांना पीक पद्धती बद्दल मार्गदर्शन,शेतकरी प्रशिक्षणासह शेती संबंधी नव नवीन तंत्रज्ञानाची माहिती केंद्रावर शेतकऱ्यांना दिली जाणार आहे.कृषी केंद्रांना केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करणार आहे.कृषी विभागाच्या योजना राबवत असताना शेतकऱ्यांना त्याची माहिती सहजरीत्या स्थानिक पातळीवरच उपलब्ध व्हावी यासाठी या प्रधानमंत्री किसान समृध्दी केंद्राचा मोठा उपयोग शेतकऱ्यांना होणार आहे.

केंद्र सरकारने शेतकरी हितासंबंधी घेतलेल्या अनेक योजनाविषयक व पीएम किसान योजना बाबत शेतकऱ्यांना माहिती शरद बुट्टे पाटील यांनी दिली.युवामोर्चाचे तालुकाध्यक्ष काळूराम पिंजन,जिल्हाउपाध्यक्ष संजय रौंधळ,सुनील देवकर, दत्तात्रेय मांडेकर,रोहित डावरे,दत्तात्रय टेमगिरे,शिवाजी वाळुंज, सरपंच ताईबाई सप्रे,सागर जावळे,उपसरपंच काळूराम राळे, अशोक भोकसे,महेंद्र आवळे,महेंद्र पडवळ,बाबाजी सोंडेकर, शिवकाली खेंगले,तालुका कृषी अधिकारी नंदू वाणी व कृषी सहाय्यक ज्योति राक्षे व कुरकुंडी येथील भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांसह शेतकरी उपस्थित होते.