खेड तालुक्यातील ११३ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पद आरक्षण सोडत जाहीर

०५ मार्च २०२५ ते ०४ मार्च २०३० या कालावधीत ग्रामपंचायत सोडत आरक्षण

खेड तालुक्यातील ११३ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पद आरक्षण सोडत जाहीर

महावार्ता लाईव्ह |  जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे (ग्रामपंचायत शाखा) यांच्यावतीने खेड तालुक्यातील ११३ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकांच्या अनुषंगाने सरपंच पदासाठी आरक्षण सोडत कार्यक्रमाचे आयोजन चंद्रमा गार्डन मंगल कार्यालय, राजगुरूनगर येथे करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खेड तालुक्याचे तहसीलदार प्रशांत बेडसे होते. त्यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडतीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडली.

सदर सोडतीच्या माध्यमातून ०५ मार्च २०२५ ते ०४ मार्च २०३० या कालावधीत अनुसूचित क्षेत्र व बिगर अनुसूचित क्षेत्रामधील ग्रामपंचायतींतील सरपंच पदे अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागासवर्गीय (OBC) तसेच स्त्रिया यांच्यासाठी आरक्षित करण्यात आली.

 

आरक्षण यादी पुढील प्रमाणे -