तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मिळावी - आमदार काळे

ग्रामीण रुग्णालय आळंदी येथे आढावा बैठक; आमदार बाबाजी काळे यांनी घेतले आरोग्यसेवा सुधारणेसाठी ठोस निर्णय

तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मिळावी - आमदार काळे

Khed MLA Babaji kale 

आळंदी | ग्रामीण रुग्णालय आळंदी येथे आज आयोजित आढावा बैठकीत आमदार  बाबाजी काळे यांनी रुग्णालयाच्या सेवा व सुविधांच्या सुधारणेसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. खेड तालुक्यातील जनतेस उत्तम आरोग्य सेवा मिळावी, या उद्देशाने ते कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

बैठकीत रुग्णालयाच्या विविध अडचणी व कमतरता यावर सविस्तर चर्चा झाली. आमदार काळे यांनी रुग्णालय प्रशासन व अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणांची अद्ययावतता, औषधांचा पुरवठा, तज्ञ डॉक्टरांची उपलब्धता आणि स्वच्छता व्यवस्थापन यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.

 

यावेळी त्यांनी खेड तालुक्यातील आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. "तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळावी, यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन," असेही त्यांनी सांगितले.

 

या बैठकीत स्थानिक प्रशासन, वैद्यकीय अधिकारी व नागरिकांनी सहभाग घेतला आणि त्यांच्या समस्या मांडल्या. आमदार काळे यांनी सर्व समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देत त्वरित अंमलबजावणीचे आश्वासन दिले. हॉस्पिटलच्या विकासासाठी घेतलेले हे निर्णय तालुक्याच्या आरोग्यसेवेचा दर्जा सुधारण्यास मोलाचा हातभार ठरतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.