राजगुरूनगरला हत्येच्या निषेधार्थ मोर्चा
राजगुरूनगर : जैन साधू आचार्य श्री.कामकुमारनंदजी गुरु महाराज यांचे ५ जुलै २०२३ रोजी कर्नाटक राज्यात बेलगाम जिल्ह्यातील चिक्कोडी जवळील हिरेकोडी येथे अज्ञात इसमांनी अपहरण करून निर्घृण हत्या केल्याच्या निषेधार्थ राजगुरूनगर येथील जैन सकल संघाने शहरातून मोर्चा काढून या दुर्देवी घटनेचा जाहिर निषेध केला. तसेच खेडचे तहसीलदार यांना निवेदन दिले व साधू आचार्य श्री कामकुमारनंदजी गुरु महाराज यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली.
राजगुरूनगर शहरातील जैन संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात जैन साधू आचार्य श्री. कामकुमारनंदजी गुरु महाराज यांचे ५ जुलै २०२३ ला कर्नाटक राज्यात बेलगाम जिल्ह्यातील चिक्कोडी जवळील हिरेकोडी येथे अज्ञात इसमांनी गुरु महाराजांचे अपहरण करून निघृण हत्या केल्याची निंदनीय व दुर्दैवी घटना घडली आहे.या घटनेचा समस्त भारतात जैन बांधवानी तीव्र शब्दात निषेद व्यक्त केला आहे. या घटनेतील मारेकरी यांना कठोर शिक्षा होण्यासाठी आम्ही तीव्र मागणी करत आहोत.जैन साधू संत हे पायी विहार करत असताना विहार मार्गवर सुरक्षितता मिळावी.अशा निर्दयी घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सरकारने कठोर पाऊले उचलावीत
जैन धर्मियांची धर्मिक स्थळे व मंदिरे यांच्या धार्मिक कार्यक्रमांना सुरक्षितता पुरवावी.अशा प्रलंबित घटनांचा निकाल लवकरात लवकर लावून आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने अशा प्रलंबित केसेस फास्ट फास्टट्रैक कोर्टामार्फत चालवून आरोपींना लवकरात लवकर शिक्षा द्यावी अशी मागणी केली.
निषेध मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन देताना जैन सकल संघाचे राजगुरूनगर शहरातील पदाधिकारी व व्यापारी मोठ्या संख्येने हजर होते.
