Khed | भामा - आसखेड धरण १०० टक्के भरले
६९७९ क्युसेकने विसर्ग सुरू
राजगुरूनगर : खेड तालुक्यातील भामा आसखेड धरण १०० टक्के भरल्याने खेड,शिरूर,दौंड,हवेली या चार तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला आणि पुणे व पिंपरी चिंचवड मनपातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी प्रश्न सुटला आहे.धरणाचे पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस कोसळत असल्याने धरण ओव्होरफ्लो झाले.
धरण प्रशासनाने रविवारी (दि.२५) रोजी दुपारी १२-३० वाजता धरण सांडव्याचे चारही दरवाजे वर करून ६९७९ क्यूसेकने विसर्ग वाढविला आहे.तसेच सांडव्याद्वारे पाणी भामा नदीपात्रात सोडले जात असल्याने नदीकाठच्या नागरिकांना दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहेत.धरणाचे पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक पाहून सांडव्याद्वारे विसर्ग वाढविणे किंवा कमी करणे याबाबत निर्णय धरण प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे.
धरणातून पाणी नदी पात्रात सोडल्याने नदीपात्रात कुणीही उतरू नये आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत.सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यावी व पाटबंधारे विभागास सहकार्य करावे असे आवाहन भामा आसखेड धरण प्रशासनाने केले आहे.
