सुधीर मुंगसेंनी तुतारी वाजवत केली घरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

खेड तालुक्यात गणपती उत्सवात " मुंगसेंच्या तुतारीची " चर्चा

सुधीर मुंगसेंनी तुतारी वाजवत केली घरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

 

राजगुरूनगर : दरवर्षी गणपती बसविण्यात येणाऱ्या गणेशभक्त नागरिकांनी पारंपारिक वाद्याच्या गजरात वाजतगाजत आणि गणपती बाप्पा मोरया अशा जोरजोरात घोषणा देत भक्तीभावाने घरात श्रीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभेसाठी इच्छुक असलेले तालुक्यातील युवानेते सुधीर मुंगसे यांनी तर चक्क तुतारी वाद्याच्या गजरात गणरायाच्या मूर्तीची मिरवणूकीने घरामध्ये श्रीची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली.मुंगसे यांनी पक्षाचे चिन्ह असलेल्या तुतारी वाद्याने गणपती मूर्तीची मिरवणूक काढून प्राणप्रतिष्ठा केल्याने तालुक्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.

 

घरगुती नागरिक व सार्वजनिक मंडळाचे कार्यकर्त्याकडून गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साही आनंदी वातावरणात करण्यात आली.ढोल ताशा,झाँज पथक आदी पारंपारिक वाद्याच्या गजरात गणेशभक्तांनी मिरवणूक काढून आणि गणपती बाप्पा मोरया अशा जोरजोरात घोषणा देत गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली.अशा भक्तिमय वातावरणात गणेश बाप्पाचे आगमन तालुक्यात सगळीकडे उत्साहात झाले.खेड आळंदी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी तीव्र इच्छुक असल्याने तिकिटासाठी तशी टाईट फिल्डिंग त्यांनी पक्षांकडे लावली आहे.

 

घरात गणपतीची मूर्ती बसविताना ती वाजतगाजत आणताना त्यांनी आपल्या पक्षाचे चिन्ह असलेले तुतारी वाद्याच्या गजरात घरात आणल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि राजकीय चर्चा देखील 
सुरु झाली.मुंगसे यांनी घरच्या बाप्पाचे आगमन तुतारी वाजवत केल्याने गणपती बाप्पाच्या साक्षीने विधानसभा लढविण्याचे संकेत दिल्याचे स्पष्ट होत आहे ?

 

मुंगसे यांनी फेसबुक सोशल मीडियावर घरच्या गणपतीचे फोटो शेयर केल्यावर खेड तालुक्यात फोटोची चर्चा होत आहे. " नितीन देवकर या युजर ने "विघ्नहर्ता आपल्या मार्गातील सर्व विघ्न दूर करो, येणाऱ्या खेड आळंदी विधानसभेमध्ये आपल्याला मतदारराजा भरघोस मतांनी विजयी करून तालुक्याची सेवा करण्याची संधी चांगल्या प्रकारे देवो ही गणराया चरणी प्रार्थना" अशा कमेंट युजरकडून करण्यात येत आहे.