चांडोली ग्रामीण रुग्णालयात कायदेविषयक शिबिर संपन्न : अँड.देविदास शिंदे पाटील

चांडोली ग्रामीण रुग्णालयात कायदेविषयक शिबिर संपन्न : अँड.देविदास शिंदे पाटील

राजगुरूनगर : प्रतिनिधी
खेड तालुका वकिलबार असोसिएशनच्या वतीने चांडोली ग्रामीण रुग्णालय येथे कायदेविषयक शिबिर संपन्न झाल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अँड देविदास युवराज शिंदे पाटील यांनी दिली.
    'आजादी का अमृत महोत्सव' या अभियानाअंतर्गत रविवारी (दि.१०) चांडोली ग्रामीण रुग्णालय ठिकाणी आयोजित कायदेविषयक शिबिरात मार्गदर्शन करण्यात आले.हा कार्यक्रम असोसिएशनचे अध्यक्ष अँड. देविदास शिंदे पाटील यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण इंगळे व चांडोली ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य कर्मचारी हजर होते.
        यावेळी खेड तालुका वकीलबार असोसिएशनचे उपाध्यक्ष अँड गणेश गाडे पाटील,सचिव अँड संदीप गाडे,अँड प्रवीण पडवळ,माजी उपाध्यक्ष संदीप रेटवडे, सरसेनापती हंबीरराव विधी महाविद्यालयाचे प्रा.चव्हाण मॅडम व विद्यार्थी हजर होते.अँड देविदास शिंदे पाटील यांचे भाषण झाले.तर डॉ.प्रवीण इंगळे यांनी मेंटल हेल्थ अवेअरनेस कायद्याविषयी मार्गदर्शन करून सविस्तर माहिती दिली.
        वर्षभरात समाजहिताचे अनेक उपक्रम राबविणार असून कायदेविषयक शिबिरातून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले कोर्टातील खटले निकाली निघावेत यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे अँड शिंदे यांनी बोलताना सांगितले.