Shirur loksabha | कट्टर प्रतिस्पर्धी आढळराव पाटील व खा.कोल्हे एकाच व्यासपीठावर

खेड तालुक्यातील वाडा गावातील अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमाच्या भेटी वेळी दोघेही उमेदवार एकाच व्यासपीठावर

Shirur loksabha | कट्टर प्रतिस्पर्धी आढळराव पाटील व खा.कोल्हे एकाच व्यासपीठावर

राजगुरुनगर | शिरूर लोकसभा मतदारसंघात मतदान जवळ येत आहे. तशी दोन्ही उमेदवारांमध्ये चुरस निर्माण होत आहे. महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांच्यामध्ये रोजच शाब्दिक युद्ध सुरु असतं.

 

खेड तालुक्यातील वाडा गावातील अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमाच्या भेटी वेळी दोघेही उमेदवार एकाच व्यासपीठावर आले. दोघांनी हस्तांदोलन करत चरण स्पर्श केला. यावेळी ग्रामस्थांनी आढळराव पाटलांच्या शेजारी कोल्हेंना जागा करुन दिली. माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी सुरुवातीला भाषण केलं आणि नंतर अमोल कोल्हे यांचं भाषण झालं.

 

 

आढळराव पाटलांच्या भाषणानंतर कोल्हे आल्याने त्यांनी आढळराव पाटलांचे भाषण ऐकले नाही. पण कोल्हे आल्यानंतर आढळराव पाटलांना मात्र कोल्हेंचं भाषण ऐकावं लागलं. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या भाषणातून मोदी सरकारवर महागाई बेरोजगारी शेतकय्रांच्या शेतीमालाला बाजारभाव नाही यांसारख्या मुद्यावरून पंतप्रधानांसह सरकारवर जोरदार टीका केली.