Khed | मनसे सहकार जिल्हाध्यक्षपदी निता आल्हाट यांची निवड

Khed | मनसे सहकार जिल्हाध्यक्षपदी निता आल्हाट यांची निवड

अमितकुमार टाकळकर 

 

राजगुरुनगर : येथील डॉ. नीता कृष्णा आल्हाट यांची महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेच्या जिल्ह्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

प्रदेश सरचिटणीस रिटा गुप्ता यांच्या शिफारसीवरून सहकार सेल प्रमुख दिलीप धोत्रे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. त्यांना खेड, आंबेगाव, जुन्नर व शिरूर तालुक्याची जबाबदारी दिली आहे. उत्तर पुणे जिल्ह्यात सहकारी संस्थांच्या माध्यमातून मनसे पक्षाचा विस्तार करणार असल्याचे आल्हाट यांनी नियुक्तीनंतर सांगितले.