शिंदे गावातील ज्येष्ठ शेतकरी जेजेराम (आप्पा) टेमगिरे यांचे निधन
खेड तालुक्यातील शिंदे गावचे ज्येष्ठ शेतकरी जेजेराम (आप्पा) चेंडीराम टेमगिरे (वय ८५) यांचे निधन झाले. शेती, दुग्ध व्यवसाय, जाधववाडी धरण पाणी योजना आणि डाऊ केमिकलविरोधी आंदोलनातील त्यांच्या योगदानाला ग्रामस्थांनी श्रद्धांजली वाहिली.
महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यातील शिंदे गावातील ज्येष्ठ शेतकरी व आदर्श व्यक्तिमत्त्व कै.जेजेराम (आप्पा) चेंडीराम टेमगिरे (वय ८५) यांचे दुःखद निधन झाले. शेतीवर निस्सीम प्रेम असलेल्या आप्पांनी जाधववाडी धरणातून स्वतंत्र पाणी योजना उभारून भामचंद्र डोंगराच्या पायथ्याशी शेती विकसित केली. ऊस, कांदा, बटाटा, सोयाबीन व भूईमूग यांसारखी नगदी पिके घेण्याबरोबरच त्यांनी उत्कृष्ट दुग्ध व्यवसायही उभारला.
डाऊ केमिकलविरोधातील आंदोलनातही त्यांनी सक्रिय सहभाग घेत ग्रामस्थांच्या पाठीशी उभे राहिले. त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुलगे, २ मुली, जावई, सुना, नातवंडे व पतवंडे असा मोठा परिवार आहे. शिंदे गावचे उद्योजक भगवान टेमगिरे यांचे ते वडील, तर राजेश टेमगिरे व प्रथमेश टेमगिरे यांचे आजोबा होते.