खेडच्या औद्योगिक परिसरात ढाबा व हॉटेलमध्ये जोरात सुरू अनधिकृत दारूची विक्री.

खेडच्या औद्योगिक परिसरात ढाबा व हॉटेलमध्ये जोरात सुरू अनधिकृत दारूची विक्री.पोलीस अधिकारी व उत्पादन शुल्क विभागाचा कानाडोळा

खेडच्या औद्योगिक परिसरात ढाबा व हॉटेलमध्ये जोरात सुरू अनधिकृत दारूची विक्री.

राजगुरूनगर : प्रतिनिधी
खेड तालुक्याच्या एमआयडीसी क्षेत्राच्या परीसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत धंदे फोफावले आहेत.या अनधिकृत धंद्यामुळे तरुणवर्ग व्यसनाधीन होऊ लागल्याने गावातील शांततेचे वातावरण बिघडून गावात वाद वाढले आहेत. कंपनीतील कामगारांना लुटमारीच्या प्रकाराने चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने कामगार असुरक्षित आहे.या गंभीर प्रकाराकडे एमआयडीसी क्षेत्रातील चौकीचे प्रभारी अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष आहे.
      खेड तालुक्याच्या अनेक भागात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहती आहेत.त्यामुळे खेडच्या अनेक परिसरात मोठ्या प्रमाणात कारखानदारी आहे.ज्या भागात कारखाने आहेत त्या परिसरात ढाबे,हॉटेल तसेच  मटणाच्या खानावळी असून यामध्ये सर्रास मांसाहारी  जेवणासह देशी-विदेशी दारुच्या बाटल्याची अनधिकृतपणे विक्री होत आहे.ढाबा,हॉटेल व खानावळ चालविणाऱ्यांकडे कसलाही शासनाचा परवाना (खाद्य गृह लायसन्स) नाही. तसेच परमिट रूम बिअर बार यांचाही परवाना नसताना ढाबा,हॉटेल व खानावळ चालक बिनधास्तपणे दारूच्या बाटल्यांची अनधिकृत विक्री करीत आहेत.सर्व प्रकारच्या  देशी विदेशी बनावट दारूच्या बाटल्या ढाब्यावर रात्रीच पोहोच होत असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.दरमहा आर्थिक संबंध जोपासण्यात येत असल्याने या गंभीर प्रकाराकडे खेडचा उत्पादन शुल्क विभाग व एमआयडीसी क्षेत्रातील पोलिस मुद्दाम कानाडोळा करीत आहेत.
        एमआयडीसी क्षेत्राच्या परिसरात हजारो हॉटेल,ढाबे, खानावळी असून त्यातील अनेकांमध्ये दारूच्या बाटल्यांची सर्रास विक्री होत आहे.अनेक गावातील तरुण व्यसनाधीन बनत चालला असून गावचे शांततेचे वातावरण बिघडण्यास हे अनधिकृत दारू धंदे कारणीभूत ठरत आहेत.तसेच कामावरून रात्री घरी जाताना कामगारांना लुटण्याचे अनेक प्रकार घडत आहेत.दिवसेंदिवस चोऱ्यामाऱ्याचे प्रमाण वाढत चालले आहे.पोलिसांकडून गुन्हेगारीला आळा बसत नसल्याने गुन्हेगारी क्षेत्र वाढत आहे.
      पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याने मूळमुळीत कारवाईने दुसऱ्या दिवशी दारूधंदा सुरू होते.पोलिसांनी अगर उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी एकही अनधिकृत धंदा कायमचा बंद केला नाही.अनधिकृत व्यावसायिकांचा मिल जुलके आर्थिक संबंध घट्ट असल्यामुळे पोलिस व उत्पादन शुल्क विभाग या धंद्याकडे मुद्दाम कानाडोळा करून दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा लोकांमध्ये आहे. एमआयडीसी परिसरात फोफावलेले हे अनधिकृत धंदे बंद करण्याची हिंमत अद्याप कोणीच दाखवली नाही ही सत्यस्थिती आहे.आता हे अनधिकृत धंदे कधी बंद होणार  असा सवाल नागरिक करीत आहेत.