खेड पंचायत समितीचे उपसभापती अमर कांबळे होणार ?

खेड पंचायत समितीचे उपसभापती अमर कांबळे होणार ?

राजगुरूनगर - प्रतिनिधी

   खेड पंचायत समितीचे उपसभापतीपदाची निवडणूक मंगळवारी (दि.१२) रोजी होत आहे.शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य अमर कांबळे यांना उपसभापतीपदाची लॉटरी लागणार असल्याचे स्पष्टपणे बोलले जात आहे.
      खेड पंचायत समितीचे एकूण १४ सदस्य असून, त्यामध्ये शिवसेना पक्षाचे ८,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ४, काँग्रेस १ आणि भाजप १ असे पक्षीय बलाबल आहे. आकडेवारी वरून खेड पंचायत समितीत शिवसेना बहुमतात आहे.परंतु परिस्थिती वेगळी असून सेनेच्याच पाच सदस्यांनी पक्षाशी फारकत घेतलेले सेनेचे पाच बंडखोर  सदस्य,राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आणि भाजपचा १ सदस्य मिळून अशा १० जणांचा वेगळा ग्रुप पंचायत समितीत तयार झाला आहे. त्यामुळे आता पक्ष विरहित भूमिका घेऊन एकत्र आलेले १० सदस्य ठरविणार तोच सभापती व उपसभापती होणार हे तितकेच सत्य आहे.
------------------------------------------------------------------------