सातकरस्थळ ग्रामपंचायत उपसरपंचपदी युवा नेते मयुर जगदाळे यांची निवड
वॉर्ड क्रमांक दोन मधून मयुर जगदाळे पंचवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवडून आले.आता सुरवातीलाच उपसरपंचपदाची माळ गळ्यात पडली.उपसरपंचपदी वर्णी लागल्याने तरुण वर्गासह तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
राजगुरुनगर : खेड तालुक्यातील महत्वाच्या सातकरस्थळ ग्रामपंचायत सरपंचपदाचा पदभार सौ.ऋतीका आकाश सातकर यांनी स्वीकारला.त्यानंतर सरपंच सातकर यांच्याच अध्यक्षतेखाली झालेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत युवानेते मयूर विठ्ठल जगदाळे यांची बिनविरोध निवड झाली.

सातकरस्थळ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकित ऋतीका आकाश सातकर यांची लोकनियुक्त सरपंच म्हणून जनतेतून निवड झाली होती.त्यानंतर शुक्रवार (दि.२२) रोजी उपसरपंचपदाची निवडणूक ग्रामपंचायत सभागृहात संपन्न झाली.निवडणूक निरीक्षक म्हणून सुहास जोशी व ग्रामसेवक निलेश पांडे यांनी काम पाहिले.उपसरपंच पदासाठी मयूर जगदाळे यांचाच एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा सरपंच सातकर यांनी ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत सभागृहात केली.निवडीनंतर सरपंच,उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
निवडणूक प्रसंगी सभागृहात माजी सरपंच व जेष्ठ सदस्य अजय चव्हाण,प्रमोद सुपे,निलेश अरबूज,स्वाती सातकर,नयना काळे,अमिता सातकर,जयश्री पडवळ ,वर्षा देवरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.उपसरपंचपदाची निवडणूक खेळीमेळीच्या व आनंदी वातावरणात पार पडली.यावेळी राजगुरूनगर पोलिसांचा बंदोबस्त होता.
गावातील आवश्यक विकासकामांना प्राधान्यक्रम देऊन गावचा विकास साधला जाईल.नागरिकांना दररोज पाणीपुरवठा नियमितपणे सुरु राहण्यासाठी प्रयत्न असून आवश्यक सुविधा पुरविल्या जातील असे उपसरपंच मयूर जगदाळे यांनी निवडी प्रसंगी सांगितले.
