Khed | खा. कोल्हेंचा दौरा ; चर्चा मात्र पाच वर्षानंतर आमच्या गावात सहर्ष स्वागत फ्लेक्सची
खेड तालुक्यातील रासे,भोसे गावाच्या हद्दीलगत पाच वर्षानंतर आपले आमच्या गावात स्वागत, असे फ्लेक्स लाऊन खासदाराचे अनोख्या पद्धतीने केले स्वागत
राजगुरूनगर | शिरूर लोकसभा निवडणुक प्रचाराचा रणसंग्राम सुरु असून मतदारसंघातील राजकीय वातावरण आता चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादीचे शिवाजी आढळराव पाटील आणि त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खा.अमोल कोल्हे अशी दुरंगी लढत होणार हे निश्चित आहे.दोन्ही उमेदवारांकडून मतदारसंघात ठिकठिकाणी जोरदार प्रचार सुरू आहे.
खेड तालुक्यातील कोल्हे यांचा आजचा दौरा अजूनही अनेक गावातील पूर्ण झाला नाही.अजूनही टाकळकरवाडी,होलेवाडी, पाडळी, जऊळके खुर्द, राक्षेवाडी,शिरोली अनेक गावांचा दौरा बाकी आहे.आता या गावात कोल्हे यांचे ग्रामस्थ कसे स्वागत करत हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे यांच्याबद्दल लागलेल्या बॅनर्सची चर्चा जिल्ह्यात सर्वत्र होत असून,गेल्या पाच वर्षात खासदार म्हणून डॉ. अमोल कोल्हे यांचा जनसंपर्क कमी असून नागरिकांचे प्रश्न जाणून घेण्यात ते कमी पडले असल्याच्या चर्चा अनेक गावांमध्ये नागरिकांमधून ऐकायला मिळत आहेत.यामुळे कोल्हेना मतदारांच्या रोशाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे.
