Pune gramin Police raid | खेड तालुक्यात दोन जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा धडक छापा; दोन कारवाईत २६ जणांवर गुन्हे, ८.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
एकाच दिवशी दोन ठिकाणी छापे; वरची भांबुरवाडी आणि चांडोली येथे पोलिसांचा धडक छापा, चारचाकी-दुचाकींसह मोठा मुद्देमाल जप्त
महावार्ता लाईव्ह | पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांचे पथक, जिल्हा व स्थानिक गुन्हे शाखा (LCB) व खेड पोलिस यांनी संयुक्तपणे कारवाई करीत खेड तालुक्यात अनेकांच्या वरदहस्ताने बिनधास्तपणे दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या तीन पत्ती जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई करत एकूण २६ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.खेड तालुक्यात मोठी कारवाई झाल्याने जुगाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.
दोन्ही कारवाईत रोख रक्कम,जुगार खेळण्याचे पत्ते तसेच चारचाकी व दुचाकी वाहनांसह एकूण ८ लाख ३० हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी रोख रक्कम अधिक जप्त करण्यात आली, मात्र कागदोपत्री कमी का असा सवाल काहींनी दबक्या आवाजात केला आहे.
पहिली कारवाई वरची भांबुरवाडी (ता.खेड) येथील दिलीप धोंडिभाऊ वाळुंज यांच्या पत्राशेड मध्ये परिसरात करण्यात आली.या कारवाईत पत्त्यांचा जुगार खेळणारे आरोपी अजय रामदास सांडभोर (रा.पडाळवाडी ता.खेड), विजय वसंत कुलकर्णी (रा.नेहरूनगर पिंपरी), भगवान बाळाराम भोईर(रा.कासारवाडी), शशीकांत विठ्ठल बाणखिले (रा.मंचर), कांतीलाल माणिक नागटिळक (रा.गवळीमाता भोसरी), मनोज गंगाराम शिंदे (रा.चांडोली ता.खेड), दत्तात्रय गणेष राहीरीकर (रा.वारजे माळवाडी पुणे), ज्ञानेष्वर गोविंद भांबुरे रा.ढोरेभांबुरवाडी ता.खेड), चंद्रकांत गणपत भांबुरे (रा.ढोरेभांबुरवाडी ता.खेड), सातप्पा वैजनाथ सुरवसे (रा.चाकण बालाजीनगर ता.खेड), यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुगार खेळत असलेल्या या ठिकाणाहून रोख रक्कम, पत्ते, दोन चारचाकी व सात दुचाकी वाहने असा ३ लाख ५२ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तर दुसरी कारवाई चांडोली (ता.खेड) गावच्या हद्दीत दिगंबर सावंत यांचा जनावरांचा गोठा,महामार्ग टोलनाक्याजवळ करण्यात आली. या कारवाईत जुगार खेळणारे आरोपी गणेष किषोर कांबळे (रा.आंबेडकरनगर,मुंबई), व्यंकट शंकर पवार (रा.इंद्रायणीनगर,पुणे), दशरथ गोरख येवले (रा.कान्हेवाडी तर्फे चाकण), कांता लक्ष्मण पवार (रा.मोरेवस्ती, चिखली), लक्ष्मण मरीबा गायकवड (रा. मिलिंदनगर,पिंपरी), मनोज बैजनाथ गुप्ता (शनीनगर, कात्रज,पुणे), अक्षय महेश पाठक (रा.आळेफाटा), विलास मारुती राठोड (रा. वारजेमाळवाडी,पुणे), हनुमंत नरषप्पा पल्ले (रा.आनंदनगर, चिंचवड स्टेशन), अमित सुरेश पडवळ वय (रा.संभाजी चौक, मंचर), राजेंद्र शामराव आलदर (रा.मासूळकर कॉलनी,अजमेरा, पिंपरी चिंचवड), अनिकेत हरी गावडे (रा.वारजे माळवाडी,पुणे), समीर वसंत सातकर (रा.तिन्हेवाडी रोड,राजगुरूनगर,ता.खेड) राजाभाऊ आनंदराव जिरे (रा.वारजे माळवाडी,पुणे), यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जुगार खेळणाऱ्या ठिकाणाहून रोख रक्कम,पत्ते तसेच दोन चारचाकी वाहने असा ४ लाख ७७ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दोन्ही प्रकरणांमध्ये पोलीस अंमलदार सागर वसंत शिंगाडे यांनी फिर्याद दिली असून, खेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३७६/२०२६ व ३७७/२०२६ दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अंतर्गत गुन्हे नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.