शिवेच्या उपसरपंच निर्मला कोळेकर यांचा तडकाफडकी राजीनामा

पंचायत समितीची निवडणूक लढविण्याचा मनोदय

शिवेच्या उपसरपंच निर्मला कोळेकर यांचा तडकाफडकी राजीनामा

राजगुरूनगर : खेड तालुक्यातील शिवे - वाकी तर्फे वाडा या संयुक्त गावच्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ.निर्मला मारती कोळेकर यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला आहे.नवीन उपसरपंच कोण होणार याकडे दोन्ही गावच्या नागरिकांचे लक्ष लागले आहे.

पंचायत समितीचे माजी उपसभापती चांगदेव शिवेकर व पंचायत समिती माजी सदस्य रोहिदास गडदे हे शिवे गावातील असल्याने यांना मानणारे ग्रामपंचायत सदस्य आहेत.गावच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे आपली मुदत संपताच निर्मला कोळेकर यांनी तडकाफडकी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला.यामुळे इतर सदस्यांना उपसरपंचपदाची संधी मिळणार आहे.आपल्या काळात कोळेकर यांनी शिवे व वाकी तर्फे वाडा या दोन्ही गावात  लोकोपयोगी अनेक कामे गावात मार्गी लावली आहेत.अनेक विकासकामे केल्याने कोळेकर यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा देऊ नये असा सुरु होता.परंतु गाव बैठकीत दिलेला शब्द पाळण्यासाठी आणि इतरांना संधी मिळावी म्हणून त्यांनी राजीनामा दिला आहे.आता नवीन उपसरपंच कोण होणार याची उच्छुकता नागरिकांना लागली आहे.

उपसरपंच पदाचा राजीनामा दिलेल्या निर्मला कोळेकर यांचे पती मारती कोळेकर हे मुंबईतील बडे उद्योजक असून ते पुणे जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शरद बुट्टे पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून खेड तालुक्यासह मुंबईत ओळखले जातात.पाईट - पिंपरी जिल्हा परिषद गटातून महिला राखीव गण झाल्यास पंचायत समितीची निवडणूक लढविण्यासाठी निर्मला कोळेकर आग्रही असून त्यांची पाईट परिसरातील गावात नातेगोत्यांचे जाळे मोठे आहे.पंचायत समितीला निवडून येण्याची त्यांची क्षमता असून आर्थिकदृष्ठ्या सक्षम उमेदवार म्हणून त्यांची गणना होत आहे.

ठरल्याप्रमाणे इतर सदस्यांना संधी मिळावी म्हणून मी मुदतीत राजीनामा दिला आहे.उपसरपंचपदाच्या काळात दोन्ही गावात विकासकामे केली आहेत.महिला राखीव गण झाल्यास आपण पंचायत समितीची निवडणूक लढविणार आहे. - सौ. निर्मला मारुती कोळेकर - माजी उपसरपंच